एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : अंबरनाथमध्ये गणपतीच्या मोदकाचा तब्बल एक लाख रूपयांना लिलाव 

Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा अंबरनाथमध्ये तब्बल एक लाख रुपयांना लिलाव करण्यात आला आहे.

Ganesh Chaturthi 2022 : अंबरनाथमध्ये (Ambernath) गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा तब्बल एक लाख रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्र मंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केला.  यावर्षी सीमा सच्चिदानंद राय यांनी हा मोदक लिलावात विकत घेतला. यासाठी त्यांनी 1 लाख 1 हजार रूपये मोजले. 

खाटूश्याम मित्रमंडळाकडून अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव ( Ganesh Chaturthi 2022 ) साजरा केला जातो. या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीला दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पाजवळ ठेवला जातो.  या मोदकाचा अनंत दतुर्दशी दिवशी लिलाव केला जातो. त्याप्रमाणे आज गणपतीच्या मोदकाचा लिलाव करण्यात आला. यावेळी या मोदकाचा लिलाव तब्बल एक लाख रूपयांना झाला. 

कोरोनापूर्वी 2019 ला या मोदकाचा 92 हजार रुपयांना लिलाव झाला होता. तर यंदाच्या वर्षी या मोदकाची बोली 41 हजार रुपयांपासून सुरू झाली आणि अखेर 1 लाख 1 हजार रुपयांना या मोदकाचा लिलाव झाला.  यावर्षी सीमा सच्चिदानंद राय यांनी हा मोदक लिलावात विकत घेतला. हा मोदक घेतल्याने वर्षभर सुख समृद्धी राहते आणि काहीही कमी पडत नसल्याची अनुभूती येत असल्याचं सीमा सच्चिदानंद राय यांचा मुलगा रोशन राय याने सांगितलं. तर यंदाच्या वर्षी मोदकाच्या लिलावाने एक लाख रुपयांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचल्याचं खाटूश्याम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी सांगितलं.

दहा दिवसाच्या पूजा विधीनंतर आज सर्वत्रच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. राज्यातील विविध भागात आज मोठा पाऊस झाला आहे. परंतु, अशा पावसात देखील भाविकांनी बाप्पाला भिजत-भिजत निरोप दिला. ठिकठिकाणी मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या. गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. अंबरनाथच्या खाटूश्याम मित्रमंडळाच्या बाप्पाला देखील आज निरोप देण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरती झाल्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याचे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी सांगितले.  

महत्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2022 Live Updates : लालबागच्या राजाला मुंबई अग्निशमन दलाकडून सायरन वाजवून सलामी   

Nashik Ganeshotsav : एकीकडे गणेश विसर्जन सुरु होत, दुसरीकडं माय लेक नदीत उडी घेत होते, तेवढ्यात....  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget