एक्स्प्लोर

समुद्रात बाप्पाचं विसर्जन करताय? मग हे एकदा वाचाच...

मुंबई : तुमच्या आमच्या घरातल्या बाप्पाला आज आपण निरोप देणार. पण हा निरोप देताना आपण समुद्रात, नदीत, तलावात वाढणाऱ्या जीवांचा प्राण घेण्याच्या तयारीत आहोत आणि हे दरवर्षी घडत आहे. विचार करा, प्रत्येकाचं रक्षण करणाऱ्या बाप्पाला तरी हे आवडेल का हो?

बाप्पाला निरोप देताना आपल्याला बरंच गहिवरुन येतं.. घर सुनंसुनं होतं.. पण बाप्पाच्या मूर्तींमुळे समुद्रातील, तलावातील, नद्यांमधील जीवांचं घर मात्र उध्वस्त होतं आणि त्याचं कारण आहे प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्ती शाडूच्या मूर्तीऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर वाढण्याची कारणंही तशीच आहेत. एका दिवसात शाडूच्या फक्त 2 मूर्ती बनतात तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 20. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वजनानं हलक्या असतात, शाडूच्या बऱ्यापैकी वजनदार असतात. शाडूच्या मूर्ती महाग असतात, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुलेननं स्वस्त.

मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं नुकसान हे महाप्रचंड आहे. पीओपीच्या मूर्तींच्या विघटनासाठी 10 ते 17 वर्षांचा काळ लागू शकतो. पीओपीच्या मूर्ती रंगवण्यासाठी कृत्रिम रंगांचा भरमसाठ वापर केला जातो. ज्यात अर्सेनिक, लीड, मर्क्युरी, कॅडियम, झिंक ऑक्साईड आणि क्रोमियचा समावेश असतो. लाल, निळा, हिरवा अशा भडक रंगांमध्ये विषारी रंगांचं प्रमाण अधिक असतं. एक थेंब मर्क्युरी 20 एकरातील तलाव विषयुक्त करतो, ज्यामुळे मासे आणि इतर जीव धोक्यात येतात. त्यामुळेच गुजरात आणि कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये मोठमोठ्या गणेशमूर्तींचा बडेजाव पाहायला मिळतो.

एकट्या मुंबईत 2 लाख 25 हजार मूर्तींचं विसर्जन गणेशोत्सवाच्या काळात होतं. ज्यात 30 फुटांपर्यंतच्या 250 हून अधिक मूर्तींचा समावेश असतो. यातील 80 टक्क्यांहून अधिक मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. शिवाय नारळ, फुलं, क्ले, जूट, प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्य समुद्रात जातं ते वेगळंच.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी जुनी आहे. पण प्रश्न धार्मिक आणि भावनिक असल्यानं सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहात नाही. 3 वर्षाच्या दुष्काळातून उठलेल्या महाराष्ट्राला पाण्याचं विष करणं परवडणारं आहे का? याचा विचार गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांनी आणि रोज उठून भाषण ठोकणाऱ्या नेत्यांनीही करायला हवा इतकंच..

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
आमच्या गावचा रस्ता कधी करता? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल, संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
आमच्या गावचा रस्ता कधी करता? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल, संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार

Embed widget