एक्स्प्लोर

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

मुंबई : मी गंमत म्हणूiन तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे 30 कोटी रुपये लाच मागितली होती, असा हास्यास्पद जबाब लाच प्रकरणी अटक झालेला आरोपी गजानन पाटील याने एसीबीला दिला आहे.   याच जबाबाच्या आधारे आज एसीबीने गजानन पाटीलला सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने एसीबीची ही मागणी फेटाळत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.   विशेष म्हणजे तीन दिवसांच्या चौकशीत गजानन पाटील हा तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जातं. त्याने कोणाच्या आदेशाने हे पैसे मागितले होते, कोणाच्या सांगण्यावरुन तक्रारदार रमेश जाधव यांना फोन केला होता, याबाबत गजानन पाटील काहीच सांगत नसून, आपण गंमत म्हणून रमेश जाधव यांना फोन केल्याचा जबाब एसीबीच्या अधिकाऱ्यांना गजानन पाटील याने दिला आहे.   गजानन पाटील याचे अनेक मंत्र्यांशी जवळचे संबंध असून, अशाप्रकारे आणखी किती लोकांकडे गजानन पाटील याने लाच मागितली आहे याचा तपास एसीबी ने सुरु केला आहे. गजानन पाटील याचे फोन डिटेल्स तपासल्यानंतर त्याने मंत्रालयातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना फोन केले होते. त्याबाबत आता एसीबीने चौकशी सुरु केली असल्याची माहिती एसीबीच्या सुत्रांनी दिली आहे.   एकनाथ खडसे यांचे ओएसडी तसेच इतकं अधिकारी आणि खडसेंच्या निकटवर्तीयांशी गजानन पाटील याचे जवळचे संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी कोण गजानन पाटील याला सहकार्य करत होते त्याचा तपास आता एसीबी करणार आहे.     गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले होते. या प्रकरणात तथ्य आढळल्यास मी स्वतः राजीनामा देईन, असं म्हणत खडसेंनी आपली बाजू स्पष्ट केली.   एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसल्याचा दावा करत तक्रारदार रमेश जाधवविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.     काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?     राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.     ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.    

संबंधित बातम्या :

'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'

लाच प्रकरणी जाधवांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : खडसे

‘लाचखोर गजानन पाटील तीन महिन्यांपासून ACB च्या रडारवर’

30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक

जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे

महत्त्वाच्या बातम्या

Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget