एक्स्प्लोर

Search Shodhgram Project : 'सर्च' संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला राज्यपालांची सदिच्छा भेट

Search Shodhgram Project : राज्यपाल कोश्यारी यांनी गडचिरोली जिल्हयातील चातगाव येथे 'सर्च' संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

Gadchiroli : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरु असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

राज्यपाल कोश्यारी यांनी गडचिरोली जिल्हयातील चातगाव येथे 'सर्च' संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले.  डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही  केली . तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. 

शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, डॉ बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध  उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते. या स्थळी येऊन हे सारे उपक्रम स्वत: अनुभवण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. दोन वर्षापूर्वी मी गडचिरोलीत आलो होतो परंतु वेळेअभावी येथे येऊ शकलो नव्हतो.  दारूबंदी व तंबाखूबंदीचे काम कठीण आहे, ते सातत्त्याने केले पहिजे. या पार्श्वभूमीवर सर्च संस्थेद्वारा गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू बंदीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, सिगारेट व बिडी पिण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी झाले आहे. उपदेश देणे सोपे आहे पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 

कोरोना साथीबाबत राज्यपाल म्हणाले की, "कोरोना अजूनही संपलेला नाही, प्रधानमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोना रोखण्यासाठी सुयोग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिबंधक  लसीकरणाबाबत या भागात जागृती व्हावी. निर्भय होतानाच जरुर काळजी  घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मी नेहमी अशा सेवाभावी संस्था आणि उपक्रमांना जाणिवेने भेट देत असतो. प्रशासकीय अधिकारी वर्गाला पण  अशा ठिकाणी नेत असतो. यातून मलाही खूप काही शिकायला मिळते. तसेच प्रशासनालाही काही चांगल्या बाबींची माहिती होते.  असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व इतर मान्यवर उपस्थित होते. 

राज्यपाल यांचे स्वागत*  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सायंकाळी चार वाजता पोलीस मुख्यालयाच्या हेलीपॅडवर आगमन झाले. राज्यपाल गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.   जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, राजशिष्टाचार अधिकारी व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
Sindhudurg News: दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना
दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Embed widget