एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलिसांना मोठं यश
अहेरी तहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पोलिसांना मोठं यश आलं.
गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अहेरी भागात पोलिसांच्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केलं.
अहेरी तहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पोलिसांना मोठं यश आलं.
मागील महिन्याभरात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गडचिरोली स्थानिक आणि छत्तीसगड पोलिस हे सतर्क होते. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी बडे पोलिस अधिकारी मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात तळ ठोकून होते.
आज नक्षलवादी सप्ताहदरम्यान सात नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने पोलिसांच्या कारवाईला मोठं यश मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement