एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीतील जांभुळखेडा भुसुरुंगस्फोटाचा तपास NIA कडे, 15 जवान झाले होते शहीद
यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा स्फोटाच्या तपासाचे पहिले प्रकरण NIA कडे देण्यात आले आहे. येत्या 2-3 दिवसात तपासाची सूत्रं NIA कडे देण्यात येणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत प्रकरणात 8 आरोपींना अटक झाली आहे.
गडचिरोली : महाराष्ट्र दिनी एक मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे झालेल्या भुसुरुंग स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA कडे देण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भुसुरुंगस्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाले होते तर एक खाजगी वाहनचालक मृत झाला होता. केंद्राच्या नव्या धोरणानुसार नक्षल संबंधित घटनांचा तपास आता NIA करणार आहे.
यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा स्फोटाच्या तपासाचे पहिले प्रकरण NIA कडे देण्यात आले आहे. येत्या 2-3 दिवसात तपासाची सूत्रं NIA कडे देण्यात येणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत प्रकरणात 8 आरोपींना अटक झाली आहे.
आता या प्रकरणी आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा समावेश असल्याने प्रकरण राजकीयदृष्ट्या लक्षवेधी झाले आहे. तपासादरम्यान अटक करण्यात आलेला एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका पदाधिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे. कैलास रामचंदानी असं आरोपीचं नाव आहे.
गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत
30 एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील 27 वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात 15 पोलिस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. सुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती. संबंधित बातम्यागडचिरोली नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी डीवायएसपीचे निलंबन
Gadchiroli | जहाल नक्षली नेत्या नर्मदाक्का पतीसह गडचिरोली पोलिसांच्या अटकेत | ABP Majha
VIDEO | गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याचा सर्वात भीषण व्हीडिओ | एबीपी माझा
VIDEO | गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली हल्ल्याच्या ठिकाणाहून 'माझा'चा | ग्राऊंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement