एक्स्प्लोर

गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी डीवायएसपीचे निलंबन, विधानपरिषदेत गृहराज्यमंत्र्यांची घोषणा

या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसदाराला अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत नोकरी दिली जाईल, असं देखील गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं.

मुंबई : गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. गडचिरोलीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाले होते.  याबाबत लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुरक्षेचे नियम पाळले न गेल्यामुळे झालेल्या या हल्ल्याला पोलीस उपअधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या नक्षलवादी हल्ला प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल सरकारला प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितलं. या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसदाराला अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत नोकरी दिली जाईल, असं देखील गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. मात्र या हल्ल्यानंतर या पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्या विरोधात भावना तीव्र होत्या. शहीद पोलिसांच्या पत्नीने देखील शैलेश काळे यांच्या विरोधात तक्रार केली होती. म्हणून पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचं निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली. यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काळे यांचं निलंबन करण्याबाबत घोषणा केली. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील 25 जवान खासगी वाहनाने प्रवास करत होते. त्यावेळी नक्षलींनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात त्यातील्या 15 जवानांचा जागीच मृत्यू झाला होता. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या. संबंधित बातम्या

गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यातील शहीद जवानांची नावे

गडचिरोली नक्षलवादी हल्ला : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शरद पवारांची मागणी

गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Embed widget