एक्स्प्लोर
लग्नाचं वचन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भाजप नेत्याला अटक
अजय येनगंटी यांची आई शकुंतला येनगंटी चालवत असलेल्या हॉस्टेलमध्ये ही अल्पवयीन मुलगी राहत होती.
गडचिरोली : अल्पवयीन मुलीला लग्नाचं वचन देऊन वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपात भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे सिरोंचा तालुका प्रमुख अजय येनगंटी यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली.
अजय येनगंटीही वाळू कंत्राटदार आहेत. तसंच ते आदिवासी विकासमंत्री अंबरीशराजे अत्राम यांचे निकवर्तीयही आहेत .
अजय येनगंटी यांची आई शकुंतला येनगंटी चालवत असलेल्या हॉस्टेलमध्ये ही अल्पवयीन मुलगी राहत होती.
पीडित मुलीच्या आई-वडिलांनी फारच कमी वयात तिचं लग्न केलं होतं. पण सासरच्या मंडळींमुळे ती फार कंटाळली होती. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ती घरातून पळाली. पण मुलीच्या आई-वडिलांनी तिला स्वत:कडे राहू दिलं नाही. त्यामुळे तिने हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
या हॉस्टेलमध्ये शकुंतला येनगंटी यांचे पुत्र अजयने तिच्याशी मैत्री केली आणि लग्नाचं वचन देऊन हॉस्टेलमध्येच अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. अजय येनगंटी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 आणि पोस्को कायदा 2012 च्या सेक्शन 9 आणि 10 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
"पीडित अल्पवयीन मुलीने सासरचं घर सोडून माहेरी आली, तेव्हा आई-वडिलांनी तिला स्वीकारलं नाही. यानंतर ती हॉस्टेलमध्ये राहू लागली. इथे तिची ओळख अजय येनगंटीसोबत झाली. लग्नाचं खोटं वचन देऊ अजयने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. आम्ही भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोस्को कायद्याअंतर्गतही गुन्ह्यांची नोंद केली आहे," अशी माहिती गडचिरोली पोलिस स्टेशनच्या पीएसआय तेजस्विनी पाटील यांनी दिली आहे.
या मुलीने सुरुवातीला बाल कल्याण समितीसमोर तक्रार मांडली होती. यानंतर समितीने पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मुलीने अनेक वेळा हॉस्टेलमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला यश येत नव्हतं. तिथून पळ काढण्यात यश मिळाल्यानंतर ती थेट बाल कल्याण समितीकडे पोहोचली आणि तिथे संपूर्ण घटनेची माहिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement