एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE: दूध दरवाढ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच

चौथ्या दिवशी दूध आंदोलन सुरुच आहे. कोंडी फोडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज बैठक पार पडणार .

मुंबई : दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी मुख्य शहरातील दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरुच ठेवलं आहे. राज्यभरात या दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत. दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संकलन बंदीचे आंदोलन सुरु केले आहे. मुंबईत काही भागात दुधाचे टँकर पोहोचलेले नसल्याने आज सकाळपासूनच दुधाचा पुरवठा उशिराने होत आहे. दुसरीकडे पुण्यात आज दुधाचा साठा संपल्यानं चितळेंचं दूध मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या दूध टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

LIVE UPDATE :

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरु दूध उत्पादक आंदोलनसंबंधी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांसह काही दूध संघाचे लोकप्रतिनिधीं ही बैठकीस उपस्थित आहे. नागपूर राजू शेट्टी आज नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्य़ाची शक्यता जालना जालना येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी चौथ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे. जालना -राजूर रोडवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको केला आहे. राजू शेट्टींची पत्रकार परिषद सरकार जो पर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी शेतकरी आज गुरा-ढोरासह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकार बरोबर चर्चा सुरु असल्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नका. जनावरांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करु नका - राजू शेट्टी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये शेतकऱ्यांनी भरचौकात म्हशींना दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध नोंदविला. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान मिळावे यासाठी राज्यात जनआंदोलन सुरू आहे. नंदुरबार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहादा येथे बऱ्हाणपूर अंक्लेशवर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सोलापूर सोलापुरातील मंगळवेढा-जत मार्गावर शेतकऱी सहकुटुंब रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहान मुले देखील सहभागी झालेत. रस्त्यावर दुभती जनावरे बांधून शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदवला. LIVE: दूध दरवाढ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच बुलडाणा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव जालना रस्त्यावरील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला आहे. अर्धा तासापासून रास्ता रोको सुरु आहे. बैलगाडीसह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री 10 वाजेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा एस. टी बस ची प्रचंड तोडफोड केली. वरवंड फाट्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून बुलडाणा-नागपूर एस टी बसच्या काचेची तोडफोड करण्यात आली. आतापर्यंत बुलढणायत 3 गाड्यांची तोडफाड केली आहे. LIVE: दूध दरवाढ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच मुंबईतील बैठक निष्फळ दूध कोंडी टाळण्यासाठी सरकारकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना चर्चेचं निमंत्रण दिले होते. तर सरकारकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना चर्चेसाठी पाठवलं होतं. मध्यरात्री राजू शेट्टी आणि गिरिश महाजन यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यानं आंदोलन सुरुच राहणार, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, मात्र योग्य निर्णय़ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू, असं शेट्टींनी म्हटलंय. दरम्यान, आज दूधकोंडीबरोबर स्वाभिमानी संघटना ठिकठिकाणी रास्तारोकोही करणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज बैठक मध्यरात्रीची बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज पुन्हा एकदा कोंडी फोडण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक घेणार आहे. आता या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील दूध पुरवठ्याचा आढावा मुंबईत आज सकाळपासून दुधाचा पुरवठा उशीराने होत आहे. काही भागात दुधाचे टँकर पोहोचू शकलेले नाहीत. मुंबईतील दूध पुरवठा हळूहळू कमी होत आहे. तर गुजरातमधून येणाऱ्या अमूलच्या दुधाचा साठाही संपत आला आहे. प्रभात आणि मदर डेअरीच्या दूध पुरवठ्यावर अद्याप परिणाम झालेला नाही. मनसेचा दूध बंद आंदोलनाला पाठिंबा महाराष्ट्रात गुजरातमधून येणाऱ्या अमूल दुधाच्या विक्रीला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध केला आहे. कालच राजू शेट्टींच्या दूध बंद आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. राज्यभर सुरु असलेल्या दूध आंदोलनाला सरकार जबाबदार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंनी आंदोलनावर आपली भूमिका मांडताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र सरकारचा कारभार केंद्रातून चालवला जातोय, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. पुणे  पुण्यात आज दुधाचा साठा संपल्यानं  चितळेंचं दूध मिळणार नाही. आज विक्रीसाठी दूध उपलब्ध नसल्याची अधिकृत घोषणा चितळे ग्रुपकडून करण्यात आली आहे. दरम्यान काल संध्याकाळपासूनच पुण्यात चितळेंच्या दुधाची टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. नेमक्या मागण्या काय? -
  • दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.
  • पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईचं दूध सरकारने 27 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:

ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी

दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 PmABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 29 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Embed widget