एक्स्प्लोर

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला चार वर्ष पूर्ण, तपास संथ होत असल्याच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक

कर्नाटक सरकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना जर पकडू शकत असेल तर महाराष्ट्र सरकार कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना का पकडू शकत नाही असा सवाल यावेळी सरकारला विचारण्यात आला आहे.

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या हत्येचा तपास संथ गतीने सुरु असल्याच्या निषेधार्थ आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मॉर्निंगवॉक करत निषेध केला. यावेळी मॉर्निंग वॉकला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.
 VIDEO | कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या, कार्यकर्त्यांचा मॉर्निंग वॉक करत निषेध | कोल्हापूर | एबीपी माझा
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या हत्येचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून याबाबत तपास यंत्रणांना अनेक वेळा न्यायालयाने फटकारले आहे. पानसरे , दाभोलकर या दोन्ही हत्यांचा तपास जलद गतीने व्हावा आणि या हत्येमागचे मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी या मॉर्निंग वॉक दरम्यान करण्यात आली आहे . यावेळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, उमा पानसरे, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे यांचेसह चळवळीतील अनेक विचारवंत उपस्थित होते. विवेकाचा आवाज बुलंद करावा, दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या करणार्‍यांना त्वरित पकडावे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच कर्नाटक सरकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना जर पकडू शकत असेल तर महाराष्ट्र सरकार कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना का पकडू शकत नाही असा सवाल यावेळी सरकारला विचारण्यात आला आहे. ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने तपास करून खरे मारेकरी समोर आणले. त्याचप्रकारे महाराष्ट्र एसआयटीनेही तपास करून दाभोळकर आणि पानसरे यांच्या मारेकऱ्यांना समोर आणण्याची गरज असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले. तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. पण यामध्ये सुधारणा होण्याची गरज असून देशातील 4 विवेकवाद्यांची हत्या झाली आहे. त्यांना न्याय मिळावा, असेही त्यांनी यावेळी म्हटले. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून 4 जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींची एसआयटीकडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या 4 जणांविरोधात 400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, खून करणे या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget