एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेवणासाठी जाताना अपघात, चार तरुणांचा जागीच मृत्यू
अपघातात ठार झालेल्या चारही जणांचे वय 20 वर्षांच्या आसपास असून ते जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी होते.
जळगाव : नशिराबाद गावाजवळ मुंबई-नागपूर हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अपघातात ठार झालेल्या चारही जणांचे वय 20 वर्षांच्या आसपास असून ते जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी होते.
रात्री उशिरा जेवणासाठी भुसावळकडे जाताना वळण रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारबरोबर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातात समोरच्या कारमधीलही तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement