करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
संजय राऊत म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीबद्दल मी जे बोललो त्याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींवर लोकांनी हल्ला चढवला तेव्हा त्यांच्या बाजूने सामनातून आम्ही लेख छापले आहेत.
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत करण्यात आलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने आता मात्र माघार घेतली आहे. या वादावरून वातावरणं तापल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, 'अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना एक पठान नेता होता. इंदिरा गांधीही त्याला पठान नेते म्हणूनच भेटल्या होत्या. तसेच ते म्हणाले की, मी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा आदर करतो.
अफगाणिस्थानातून आलेल्या आठ पठाणांचे नेते होते करिम लाला : राऊत
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 'करीम लालाची भेट सर्व राष्ट्रीय नेते घेत असत. ते अफगाणिस्थानाहून आलेल्या पठाणांचे नेते होते आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते त्यांची भेट घेत असतं.' ते म्हणाले की, 'इंदिरा गांधीही एक पठाण नेता म्हणूनच त्याला भेटत असत.' संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'करीम लाला याच्या ऑफिसमध्ये अनेक नेत्यांचे फोटोही लावलेले होते. खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत करीम लाला काम करत होता.'
पाहा व्हिडीओ : करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांची पत्रकार परिषद
काय म्हणाले संजय राऊत?
पुण्यातील लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात पत्रकारितेबाबत आपले अनुभव शेअर करताना संजय राऊत म्हणाले होते की, 'आज अंडरवर्ल्डमध्ये चिंधीगिरी होत आहे. आम्ही ते अंडरवर्ल्ड पाहिलं आहे, ज्यावेळी डॉन हाजी मस्तान मंत्रालयात जात होता. त्यावेळी लोक त्याचं स्वागतासाठी बाहेरव येऊन उभे राहत असत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील मुंबईचे डॉन करीम लाला यांना पायधुनी येथे भेटत असतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मी अशी व्यक्ती आहे जिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दम देखील दिला होता.'
कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला?
अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याचं संपूर्ण नाव अब्दुल करीम शेर खान होतं. करीम लाला याचा जन्म अफगाणिस्तानात झाला होता. 1930मध्ये करीम लाला मुंबईत आला. 1960 ते 1980 मध्ये करीम लाला मुंबईतील अंडरवर्ल्डमधील एक मोठं नाव होतं. मुंबईमध्ये करिम लाला सोनं, चांदी आणि हत्यारांची स्मगलिंग करत होता. त्यानंतर करीम लाला सट्टेबाजी आणि ड्रग्स रॅकेटही करत असे. वर्ष 2002 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईत त्याचं निधन झालं होतं.
संबंधित बातम्या :
तंगड्या तोडण्याची भाषा इथे चालणार नाही; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर