एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे वंचितच्या मुलाखतीसाठी, चर्चांना उधाण

परळी विधानसभा मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी मागितल्याने बहुजन वंचित आघाडी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगत आणणार अशी चिन्हे पाहायला मिळत आहेत.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आज बहुजन वंचित आघाडीच्या विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखतीला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादीत सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली. परळी विधानसभा मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी मागितल्याने बहुजन वंचित आघाडी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगत आणणार अशी चिन्हे पाहायला मिळत आहेत. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आज बीड येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकारणी सदस्य किसन चव्हाण, अण्णाराव पाटील, आघाडीचे महासचिव भीमराव दळे, भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे, जिल्हाध्यक्ष विष्णु जाधव, महिला आघाडीच्या रेखा ठाकूर यांनी शासकीय विश्रामगृहावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी मिळविण्यात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला मोठे यश आलं होतं आणि म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती ज्या उमेदवारांना प्रस्थापित पक्षामधून उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता वाटते. ही मंडळी बहुजन वंचित आघाडी ते दार ठोठावले शिवाय राहत नाहीत. केजच्या माजी मंत्री विमल मूंदड़ा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे विधानसभेवर निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत साठे यांचे तिकीट पक्षाने कापले व मुंदड़ा यांच्या सुनबाई नमिता मुंदड़ा लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मुंदड़ा व साठे यांच्यात धुसफुस सुरु होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कांग्रेसने घेतलेल्या मुलाखतीत पक्षाने पुन्हा एकदा नमिता मुंदड़ा यांना हिरवा कंदील देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पृथ्वीराज साठे नाराज होते आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादीकडून वंचित बहुजन विकास अघाड़ीची वाट धरली आहे. तिकडे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनीही परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली विशेष म्हणजे जिथे पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार असताना मराठा नेता अशी ओळख असलेले राजेसाहेब देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडी कडे उमेदवारी मागितल्याने परळी विधानसभा मतदारसंघातील लढती मध्ये रंगत येणार हे मात्र नक्की
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा...
Maharashtra LIVE News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा...
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
पक्ष तुमचा पण माणूस आमचा! विवेक कोल्हेंच्या सत्काराला विखे विरोधक एकवटले, जनतेच्या कामासाठी विखे पाटलांकडे जाणार
पक्ष तुमचा पण माणूस आमचा! विवेक कोल्हेंच्या सत्काराला विखे विरोधक एकवटले, जनतेच्या कामासाठी विखे पाटलांकडे जाणार
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
Embed widget