घडीत 5 चा ठोका वाजला अन् माजी मंत्र्यांच्या मुलाच्या अपहरणाची चर्चा, नेमकं काय घडलं होतं?
Rushiraj Sawant Kidnapping : माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले अशी चर्चा चालू होती. मात्र आता त्यांचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले आहे.

Tanaji Sawant Son Kidnapping : माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची चर्चा झाली होती. एका राजकीय नेत्याच्या सुपुत्राचेच अपहरण झाल्याचे समोर आल्यानतंर आता एकच खळबळ उडाली होती. पुण्यातून एका स्वीफ्ट कारच्या मदतीने हे अपहरण झाल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, आता तानाजी सावंत यांचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले आहे. अपहरणाच्या चर्चेचनंतर पुण्यातील पोलिसांनी तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.
नेमकं काय घडलं?
तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले असे म्हटले जात होते. आज संध्याकाळी 4.57 वाजता हे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते. अपहरणासाठी आरोपींनी स्विफ्ट कारचा वापर केल्याचेही म्हटले जात होते.
पुणे पोलीस अॅक्टिव्ह मोडमध्ये
तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चर्चा झाल्यानंतर पुण्यातील पोलीस सक्रीय झाले होते. पोलिसांकडून ऋषीराज सावंत यांचा कसून शोध घेतला जात होता. पुण्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. सोबतच पुण्यातील विमानतळ परिसरातही नाकाबंदी करण्यात आली होती.
नेमके सत्य काय?
तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत हे पुण्यातून प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईटने बँकॉककडे रवाना झाला होते. खासगी विमान बुक करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन पेमेंटदेखील केले होते. त्यांच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. हे खासगी विमान अंदमान निकोबार इथपर्यंत पोहोचले होते. मात्र तेथून ते पुन्हा चेन्नईला बोलवण्यात आले. त्यानंतर ऋषीराज सावंत हे पुण्यात परतले आहेत.
हेही वाचा :
Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण, पुणे विमानतळावरून गायब, पोलिसांचा तपास सुरू
























