Ashish Shelar on Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
Ashish Shelar on Sudhir Mungantiwar : जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांची आज खदखद थेट सभागृहामध्येच बाहेर पडली.

Ashish Shelar on Sudhir Mungantiwar : महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी लपून राहिलेली नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांची आज खदखद थेट सभागृहामध्येच बाहेर पडली. त्यामुळे सुधीर भाऊंनी मंत्रीपदावरून केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनाच उत्तर द्यावे लागले, अशी स्थिती निर्माण झाली.
चुकीने मी देखील काही काळ मंत्री होतो
सुधीर भाऊ आज सभागृहामध्ये बोलत असताना चुकीने मी देखील काही काळ मंत्री होतो असे म्हणालेत. त्यांच्या चुकून या शब्दामुळे आशिष शेलार चांगलेच घायाळ झाल्याचे दिसून आले. त्यांनी सुधीर भाऊंच्या खदखदीला उत्तर दिलं. ते म्हणाले की सुधीर भाऊ म्हणाले, मी चुकून मंत्री होतो, पण तसे नाही. मंत्रिमंडळाने ठरवल्यानंतर मंत्री झाले होते असं उत्तर शेलार यांनी सुधीर भाऊंच्या चुकीने मी देखील काही काळ मंत्री होतो, यावर दिले.
मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहेत?
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील धान आणि कापसाच्या मुद्द्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचे दिसून आले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचेही त्यांनी कान टोचले. ते म्हणाले की, आमचे मंत्री हुशार आहेत, पण मी सात टर्म आमदार आहे. फक्त सचिवानी सांगितलेलं उत्तर द्यायचे नसते. उत्तरात फक्त हो हे खरे आहे. हे खरे नाही असे म्हणालेत. मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहेत? जे अशी उत्तर देतात असा सवाल त्यांनी केला.
मी धान संदर्भातील प्रश्न सोडणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही
ते म्हणाले की, जीआरनुसार आपण पंचनामे केले नाहीत. सोयाबीनबाबत देखील हेच झाले. शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्याला सोडलं नाही पाहिजे. मंत्रालयातील आधुनिक वाल्मिक कराड कोण? मलाही शासन निर्णय थोडा तरी कळतो, मी ही काही दिवस चुकुन मंत्री होतो असा टोला त्यांनी लगावला. मी धान संदर्भातील प्रश्न सोडणार नाही आणि तुम्हाला ही सोडणार नाही. कारण मी भात खातो. धान उत्पादक शेतकरी यांचे पैसे देऊन टाका नाही तर मी सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या























