एक्स्प्लोर

आधी विधानसभा, लोकसभेचे वर्ग भरवा, मगच मुलांना शाळेत बोलावा, लक्ष्मण ढोबळेंचा सरकारला टोला

जीवघेण्या कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल असे वाटत नाही. देशाची ही पुढची पीढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून शाळा सुरू केली पाहिजे असा सल्ला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सरकारला दिला.

पंढरपूर : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आधी विधानसभा आणि लोकसभेचे वर्ग भरावा आणि मगच पोटच्या गोळ्यांना शाळेत बोलावावं असा टोला माजी शिक्षणमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लगावला आहे. सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील संस्था चालक आणि मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ढोबळे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना आधी विधानसभेचे वर्ग भारावून नागरिकांत विश्वास संपादन करा आणि मगच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्या असे ढोबळे म्हणाले. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जनतेतूनही बेजबाबदार वर्तन होत आहे.  मृत्यूची संख्या वाढत चालली असताना भविष्यातली पीढी तरी या संकटातून वाचली पाहिजे. जीवघेण्या कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल असे वाटत नाही. देशाची ही पुढची पीढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून शाळा सुरू केली पाहिजे असा सल्ला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सरकारला दिला. अनेक शाळा विलगीकरणासाठी वापरण्यात आलेल्या आहेत त्या शाळांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार असून यातील काही रेड झोन मधील तर काही ग्रीन झोन मधील आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधाच नसल्याने त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता येणार नसल्याचे अनेक मुख्याध्यापकांनी बैठकीत सांगितले. मुलांना शिक्षणापासून जास्त काळ दूर ठेवणे शक्य नसल्याने या बाबत काहीतरी ठोस उपाय योजताना अभ्यासक्रम कमी करून अथवा 2 वर्षाचे शिक्षण दीड वर्षात कसे द्यायचे यावर विचार करावा असे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यावेळी सरकारने आरोग्य व शिक्षणावर खर्च करावा. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी व मुख्याध्यापकांनी सुचवलेल्या सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. ऑनलाईन शिक्षणाचे धडे देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा आर्थिक व टेक्निकली सामना करावा लागत आहे, अशी खंत मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. ऊस तोडणी कामगार, साखर शाळेवरील मुले यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना हे ऑनलाईन शिक्षण परवडणारे नाही. त्यामुळे ऑनलाईन ऐवजी शाळा सुरू झाल्यावर सुट्टीत जास्त वेळ शाळा घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा अशा सूचना काही मुख्यध्यापकांनी दिल्या. तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिकत असणाऱ्या आश्रम शाळेच्या समोर अॅडमिशन पासून ते शाळेची स्वच्छता, फिजिकल डिस्टन्सिंग कशी ठेवायची असे प्रश्न आहेत. ज्यामुलांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अश्यानी ऑनलाईन शिक्षण कुठून घ्यायचं असा प्रश्न आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद बागवान यांनी केला. यावेळी कल्याणराव काळे , मंगळवेढ्यातील संस्थाचालक राहुल शहा, सुभाष माने यांच्यासह अनेक संस्थाचालक बैठकीस उपस्थित होते .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget