एक्स्प्लोर

योगेश कदम मंत्री झाले तरीही खेडमध्ये रस्त्यांची अवस्था वाईट, भाजपच्या माजी आमदारानं डिवचलं, रत्नागिरीत महायुतीत ठिणगी

खेड मधील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान भाषण करताना भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

Suryakant Dalvi Yogesh Kadam : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांनी बैठका, दौरे सुरु केले आहेत. राज्यात महायुतीत असणारे पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार? याची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र, महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे नेते एकला चलो ची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच राजकीय नेते देखील ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. खेड मधील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान भाषण करताना भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले सूर्यकांत दळवी ? 

योगेश कदम निवडून येऊन मंत्री झाले तरीही खेड मध्ये रस्त्यांची अवस्था वाईटच असल्याचे वक्तव्य  भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी करत योगेश कदम यांनी डिवचलं. रवींद्र चव्हाण येणार एवढे समजल्यावर शहरातील रस्ते रातोरात चांगले झाले. खेड नागपरिषदेत बदल झाला की काय? होईल याचा विचार करा, असं वक्तव्य देखील सूर्यकांत दळवी यांनी केलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या समोर सूर्यकांत दळवी यांचे एकला चलो रे बाबत सूचक वक्तव्य केल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबत कोणी आले तर ठीक, अन्यथा त्यांच्याशिवाय लढू, असं महत्वाचं वक्तव्य सूर्यकांत दळवी यांनी केलं आहे. दरम्यान, भाजप नेते वैभव खेडेकर यांच्यानंतर आता माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी देखील एकला चलो रे चा नारा दिला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात परिवर्तनाचा पहिला बॉम्ब खेडमध्ये फुटतो 

रत्नागिरी जिल्ह्यात परिवर्तनाचा पहिला बॉम्ब खेडमध्ये फुटतो असेही सूर्यकांत दळवी यावेळी म्हणाले. दापोली विधानसभा मतदारसंघ दत्तक घ्या असा सल्ला देखील सूर्यकांत दळवी यांनी निरंजन डावखरे यांना दिला. त्यामुळं आता सूर्यकांत दळवी यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण दळवी यांच्या टीकेवर आता मंत्री योगेश कदम काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, 2 डिसेंबर रोजी मतदान

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत  मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आजपासून म्हणजे 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Khed MIDC Rada : खेड एमआयडीसीमध्ये स्थानिक गुंडांचा हैदोस, ह्युंदाई कंपनीचे कंत्राट घेण्यावरून दोन गुंडांचे गट भिडले

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget