(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांची पंचायत समितीच्या बिडीओला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली आहे.
Siddharam Mhetre : अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांची पंचायत समितीच्या बिडीओला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. पंचायत समितीला जाळ लावून बिडीओ तुम्हाला आत टाकेन अशा भाषेत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल (Video Viral) झाला आहे. 26 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आले होते. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अक्कलकोट पंचायत समितीचे बिडीओ शंकर कविटके यांना निवेदन देताना माजी आमदार म्हेत्रे यांनी दम दिला आहे.
माझं आयुष्य कोर्ट, कचेरी, केस त्यातच गेलं
पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेन, माझं पोलीस किंवा कोणीही ××××× काही करु शकत नाही असे शब्द म्हेत्रे यांनी वापरले होते. हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळं हे जाळायला मला फार वेळ लागणार नाही असे म्हेत्रे म्हणाले. या ऑफिसला जाळ लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो मग काय करणार तुम्ही. माझ्यावर एक केस दाखल होईल. आम्ही त्यासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात 25 वर्षे केस चालेल असेही म्हेत्रे म्हणाले. माझं आयुष्य कोर्ट, कचेरी, केस त्यातच गेले, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. शांत बसलो म्हणून तुम्ही फार करू लागलात का? असा सवाल करत सिद्धाराम म्हेत्रे यांनी चुकीची भाषा वापरली आहे.
महत्वाच्या बातम्या: