एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली, एमपीएससीचा पेपरही पुढे ढकलला
राज्याच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या इमेल द्वारे प्राप्त मागणीनंतर पूरस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये एमबीबीएस/ बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली आहे. विद्यार्थी जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.
राज्याच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या इमेल द्वारे प्राप्त मागणीनंतर पूरस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये एमबीबीएस/ बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या प्रवेशासाठी पहिल्या फेरी कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत वाढून देण्यात आली आहे. विद्यार्थ्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊज प्रवेश निश्चित करण्याची गरज नाही. विद्यार्थी संकेतस्थळावर दिलेल्या आपल्या जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करू शकतील असे परिपत्रकाद्वारे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे.
एमपीएससीचा पेपर पुढे ढकलला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा ( STI main paper) 2019 मुख्य पेपर हा राज्यातील पूररिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. रविवारी 11 ऑगस्टला ही परीक्षा सकाळी 10 वाजता घेण्यात येणार होती. आता ही परीक्षा 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे कोल्हापूर, सांगली सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांनीही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. अखेर त्यांची विनंती मान्य करण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केलं जाईल.
कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे आणि नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरापासून पूरस्थिती आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे. राज्यातील पूरस्थिती पाहता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement