एक्स्प्लोर
स्टार्टअपसाठी मराठी भाषेत पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स
भारतातील स्टार्ट अप इको सिस्टिम ही पूर्णपणे इंग्रजी भाषेत कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील छोट्या शहरातील होतकरु नवउदयोजकांना स्टार्टअप संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
मुंबई : स्किलसीखो डॉट कॉम या ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपने, स्टार्टअप्स संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स सुरु झाला आहे. भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित मराठी स्टार्टअप उद्योजक, इन्व्हेस्टर, आणि मेंटॉर हे या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
स्टार्ट अपची समीकरणे ही पारंपरिक व्यवसायापेक्षा वेगळी आहेत. मात्र अनेक वेळा यातला फरकच लक्षात न आल्याने सुरुवातीच्या टप्प्यात स्टार्ट अप सुरु करणाऱ्या नव-उद्योजकांकडून अनेक चूका होत असतात. भारतातील स्टार्ट अप इको सिस्टिम ही पूर्णपणे इंग्रजी भाषेत कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील छोट्या शहरातील होतकरु नवउदयोजकांना स्टार्टअप संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेल्या विविध योजनांचे फायदे मराठी उद्योजकांपर्यंत पोहचत नाहीत.
स्टार्ट अप या विषयातील मार्गदर्शन, रिसोर्सेस, इन्क्युबेटर, असलरेटर यासारखे स्टार्ट अपशी संबंधित विविध कार्यक्रम, फंडिंग मिळविण्याची सर्वात महत्वाची प्रोसेस, आणि स्टार्ट अप इको सिस्टिमकडून स्टार्ट अप्सना मिळणारे फायदे हे सर्वच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित आहेत.
ही परिस्थिती बदलण्यासाठी मेंटॉरप्रेन्युअर्स या स्टार्ट अप्सना व्यावसायिकरित्या मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने हा ऑनलाईन कोर्स सुरु केल्याचे स्किलसीखो डॉट कॉमचे संस्थापक कुणाल गडहिरे यांनी सांगितले.
गेट माय पार्किंग डॉट कॉमचे रसिक पानसरे, मेरा किसान डॉट कॉमचे प्रशांत पाटील, पुणेसब्जी डॉट कॉमचे आदर्श केदारी, इनमराठी डॉट कॉमचे ओंकार दाभाडकर, एन लर्निंगचे सुशील मुणगेकर, आय रिऍलीटीजचे प्रसाद आजगावकर, अँपसर्फरचे अनिकेत अवटी, पोटेन्शियल अँड पॉसिबिलीटीजचे कौस्तुभ धारगलकर, मेंटॉरप्रेन्युअर्सच्या श्रद्धा पाटील आणि फिफ्टी के व्हेंचर्सचे अंशुल दवे हे नामांकित स्टार्ट अप उद्योजक पहिल्यांदाच या कोर्सच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. स्टार्टअपची सुरुवात करण्यापासून ते गुंतवणूक मिळवण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या व्यावसायिक टप्प्यांसाठी ते उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कोर्समध्ये स्टार्ट अप म्हणजे काय, स्टार्ट अपची योग्य सुरुवात कशी करावी, आपली बिझनेस आयडिया प्रत्यक्षात कार्यरत कशी करावी, मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट कसे बनवावे, सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्या चुका टाळाव्यात, ग्राहकांपर्यंत कसे पोहचावे, स्टार्ट अपला निधी अर्थात फंडिंग का मिळते, फंडींग मिळविणारे स्टार्ट अप्स नेमकी कोणती स्ट्रेटजी वापरतात, फंडिंग मिळविण्यासाठी स्वतःला आणि आपल्या स्टार्ट-अपला तयार कसे करायचे, खाजगी क्षेत्राकडून स्टार्ट अप्स दिले जाणारे लाखों रुपयांचे फायदे विनामूल्य कसे मिळवावे? अशा विविध अधिक महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन असल्याने, उद्योजकांना कोणत्याही ठिकाणाहून या कोर्सला प्रवेश घेता येईल. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी www.SkillSikho.com या वेबसाईटला भेट देता येईल. तसेच महाराष्ट्रातील विविध उद्योजकीय संघटना किंवा क्लब यांना असे कार्यक्रम राबवायचे असतील तर ते सुद्धा संपर्क करु शकतात. अधिक माहितीसाठी स्किल सिखोचे संस्थापक कुणाल गडहिरे ९८७०८६९६५१ यांच्याशी थेट संपर्क करता येईल.
कोर्सची लिंक :
https://skillsikho.com/courses/startup-in-marathi
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement