एक्स्प्लोर
धुळ्यात मध्यरात्री घर जळून खाक, पाच जणांचा गुदमरुन मृत्यू
धुळे : मध्यरात्री घरात अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. धुळे शहरातील अकबर चौकातील धना डाळ बोळीतील ही घटना आहे.
राम शर्मा यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांच्यासह कुंटुंबातील इतर चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राम शर्मा यांच्या आई, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास ही आग लागली होती.
आग लागल्यानंतर जवळपास एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तोपर्यंत घरात अडकून पडलेल्या पाचही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या दुमजली घरातील पहिल्या मजल्याला आग लागली. मात्र दुसऱ्या मजल्यावर झोपेत असलेल्या पाच जणांना बाहेर पडता न आल्याने ही घटना घडली.
या घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धुळे शहरावर शोककळा पसरली आहे.
आगीत मृत झालेल्या व्यक्तींची नावे :
शोभाबाई छाजुलाल शर्मा (62)
राम शर्मा (45)
जयश्री राम शर्मा (35)
साई राम शर्मा (12)
राधे राम शर्मा (10)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement