एक्स्प्लोर
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला आग; शेती, अकाऊंट विभागातील साहित्य, कागदपत्रे खाक
राज्यात आजचा दिवस अग्नितांडवाचा ठरला. पुणे, साताऱ्यासह यवतमाळमध्येही भीषण आग लागली. पुण्यातील आगी पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर साताऱ्यात आगीत दोन घरं जळाली, ज्यात दोन जनावरं दगावली. तर यवतमाळमधील शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे राख झाली आहेत.
यवतमाळ : यवतमाळ शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला बुधवारी (8 मे) रात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील शेती विभाग आणि अकाऊंट विभाग पूर्णत: खाक झाला आहे. शिवाय कम्प्युटर, खुर्च्या, कागदपत्रे जळून राख झाली आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं समजतं.
रात्री दीड वाजता लागलेल्या आगीवर आज पहाटे पाच वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तब्बल चार तास आग धगधगत होती. आग विझवण्यासाठी जाण्याचा मार्ग बंद होता, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी उशीर झाला, असं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाशा देशपांडे यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांची बँक म्हणून या मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. आगीत बँकेतील नेमकं किती नुकसान झालं याबाबतची अधिकृत माहिती पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होईल. बँकेतील जुना रेकॉर्ड जळाला असून शेतकऱ्यांसंदर्भातील बॅकअप डेटामधून सर्व माहिती पुन्हां मिळवली जाईल, अंस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बीड
पुणे
बीड
Advertisement