एक्स्प्लोर
प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यातील जिनिंगला आग, 2 कोटी रुपयांचे नुकसान
कापूस वेगळा करण्याच्या प्रक्रियेतील घर्षण पट्ट्यामधून ठिणगी उडाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या जिनिंगमध्ये एकूण 46 स्पिनिंग युनिट आहेत.
अकोला : अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील सम्यक जिनिंग आणि प्रेसिंगला आज पहाटे भिषण आग लागली. या आगीत तब्बल दोन कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत चार हजार क्विंटल कापूस, दोन हजार क्विंटल सरकी आणि कापसाच्या 50 ते 60 गठाणी जळून खाक झाल्यात. सम्यक जिनिंग-प्रेसिंग ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मालकीची आहे.
पहाटे 4 वाजताच्या सुमारास पातूर तालूक्यातील चिखलगाव येथे असलेल्या सम्यक जिनिंग-प्रेसिंगला भिषण आग लागली. कापूस वेगळा करण्याच्या प्रक्रियेतील घर्षण पट्ट्यामधून ठिणगी उडाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या जिनिंगमध्ये एकूण 46 स्पिनिंग युनिट आहेत. आग लागली त्यावेळी जिनिंग कंपनीत 45 मजूर होते. मात्र, सुदैवानं आग लागल्याचं लवकरच लक्षात आल्यानं हे सर्व मजूर सुखरूप बाहेर निघालेत.
आग विझवण्यासाठी पातूर नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचा एक आणि अकोला महापालिकेच्या दोन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केलेत. सकाळी अकराच्या सुमारास धुमसत असलेली ही आग विझवण्यात अखेर यश आले. सम्यक ही अकोला जिल्ह्यातील सहकारी तत्वावर चालवली जाणारी सर्वात मोठी जिनिंग फॅक्टरी आहे. आगीच्या घटनेनंतर या ठिकाणची कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे. आगीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी नुकसानाचा आढावा घेतला. संध्याकाळपर्यंत विमा कंपन्यांचे प्रतिनिधीही नुकसानाचं सर्वेक्षण करणार आहेत.
संबंधित बातम्या :
जालन्याच्या इंजिनिअर पोरांची कमाल, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटची हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा
पाकिस्तानातील टोळधाडीचं संकट महाराष्ट्रात, मध्यप्रदेशमार्गे नागपुरात पोहोचलं, शेतकऱ्यांना धास्ती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
विश्व
क्रीडा
Advertisement