एक्स्प्लोर

जालन्याच्या इंजिनिअर पोरांची कमाल, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटची हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा

जालन्याच्या तीन विद्यार्थ्यांनी एक रोबोट विकसित केलाय. हा रोबोट सध्या औरंगाबाद मधल्या घाटी रुग्णालयात आपले कर्तव्य बजावत आहे. यामुळं डॉक्टरांना पेशंटच्या संपर्कात न येता छोट्या मोठ्या साहित्याची ने आण करण्यास मदत होतेय.

जालना : कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकजण आपापले योगदान देत आहे. जालन्यात राहणाऱ्या आणि औरंगबादमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तीन तरुणांनी या कोरोना विरुद्धच्या संग्रामात रोबोटचा आविष्कार करून आपले योगदान दिलंय. लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या त्यांनी आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा जोरावर हा रोबोट तयार केलाय. ज्या माध्यमातून आता दवाखाण्यात रुग्णांची सेवा होऊ लागलीय. अभिजित बेळीकर, सोनू मोरे, शुभम कुंडलवर या त्रिकुटाने अवघ्या 10 हजारात हा रोबोट विकसित केलाय. हा रोबोट या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद मधल्या घाटी रुग्णालयाला भेट दिलाय. सध्या तो इथल्या कोरोना वार्डात आपले कर्तव्य बजावत आहे, जिथे डॉक्टरांना पेशंटच्या संपर्कात न येता बरीच छोट्या मोठ्या साहित्याची याद्वारे ने आण होत आहे. या रोबोटवर सॅनिटायझरसाठी छोटी मशीन फिट करण्यात आली असून त्याला स्पर्श न करता हात निर्जंतुक करण्याची सोय यामुळे झालीय. शिवाय दवाखण्यात ,वैद्यकीय साहित्य ने आण करण्यात याचा उपयोग होतोय. जालन्याच्या इंजिनिअर पोरांची कमाल, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटची हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा नागपुरात रोबोकडून रेल्वेचं निर्जंतुकीकरण, उस्ताद रोबोच्या सहाय्यानं रेल्वेची सफाई 10 किलो वजन असलेला हा रोबोट दीड तास चार्ज केल्यावर 5 तास काम करतो. याला बनवण्यासाठी एक दुचाकीची 12 व्हॅट ची बॅटरी लावली असून, एक गियर मोटार, इन्व्हर्टर आणि प्लास्टिक पाईप जोडून साचा करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा रोबोट जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून ऑपरेट केला जाऊ शकतो. यासाठी या मुलांनी स्वतंत्र मोबाईल अॅप मॉडीफाय करून तयार केले आहे. ज्या माध्यमातून रोबोटवर नियंत्रण ठेवले जात आहे. Robot | ठाण्यातल्या आर्या मेंगळेनं घरच्याघरी बनवला रोबोट, रुग्णांना औषधं पोहोचवण्यासाठी होणार उपयोग  या मुलांनी त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने रोबोट औरंगाबाद घाटी रुग्णालयाकडे सुपूर्द केला असून तो सध्या तिथे न अडखळता आपले कर्तव्य बजावत आहे. भविष्यात या रोबोटच्या माध्यमातून पेशंट आणि डॉक्टरचा व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून संवाद व्हावा तसेच पेशंटच्या नातेवाईकांना घरी बसून बोलता येईल अशी व्यवस्था करण्याचे या मुलांनी नियोजन केलंय, त्यावर त्यांचे काम देखील सुरू झालंय.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget