एक्स्प्लोर

भावाच्या बड्डेला जाळन धूर संगटच! सेलिब्रेशन करताना आग, लातुरात सहा लाखांच्या कडब्याची राख

वाढदिवस साजरा करण्याचा नादात वीस हजार कडब्यांची गंज जळून खाक झाल्याची घटना लातुरात घडली आहे. सेलिब्रेशन करताना फटाके फोडल्यानंतर ही आग लागली. या आगीत सहा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.

लातूर : सध्या लॉकडाऊनमुळे सगळं ठप्प आहे. अशात वाढदिवसासह वेगवेगळे सेलिब्रेशन्स घरातल्या घरात करण्यावर भर आहे. असं असताना देखील काही असामाजिक तत्व मात्र नियमांना हरताळ फासण्याचे काम करत आहेत. लातुरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. वाढदिवस साजरा करण्याचा नादात वीस हजार कडब्यांची गंज जळून खाक झाल्याची घटना लातुरात घडली आहे. सेलिब्रेशन करताना फटाके फोडल्यानंतर ही आग लागली. या आगीत सहा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. ही आग आग विझवताना यंत्रणा देखील बेजार झाल्याचं पाहायला मिळालं. मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे अनेकांना इच्छा मारुन घरीच बसावे लागले आहे. मात्र अनेक जण आपल्या इच्छा आकांक्षा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पूर्ण करत असताना दिसत आहेत. लातुरातील एका भावड्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना सहा लाखाची राख अवघ्या काही मिनिटांत झाली आहे. त्याचं झालं असं लातूरचे काही तरुण एकत्र येत एलआयसी कॉलनी भागात वाढदिवस साजरा करत होते. या  भावड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे असे अनेक संदेश सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मग लॉकडाऊन असताना भावड्याचे यार दोस्त गोळा झाले. एलआयसी कॉलनी भागातील रस्त्यावरच ही सगळी तयारी करण्यात आली. केक कापला आणि भावड्याचा वाढदिवस साजरा करताना फटाकेही वाजवले. फटाक्यांच्या आवाजाने एलआयसी कॉलनी दणाणून गेली. आणि काही कळण्यापूर्वीच त्याच ठिकाणी शेतकरी अर्जुन शेंडगे यांनी रिकाम्या प्लाटमध्ये रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीला आग लागली. वीस हजार कडब्याची गंज रचून ठेवण्यात आली होती. जिची किंमत अंदाजे सहा लाख आहे. या आगीत संपूर्ण गंज जळून खाक झाली. त्या भागात दूरपर्यंत ही आग दिसत होती. याची माहिती लोकांनी तात्काळ या भागातील नगरसेवक आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार ,नगरसेवक सुनील मलवाड यांना दिली. त्यामुळे यंत्रणा लवकर कामाला लागली. नंतर तीन अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र या गडबडीत तो बर्थडेवाला भावड्या कोण होता हे मात्र कोणीही सांगायला तयार नव्हता. भावड्याच्या वाढदिवस साजरा झाला. जाळन धूर संगटच निघाला. यात शेतकऱ्याला सहा लाखाचा फटका बसला. मात्र ते तरुण आणि वाढदिवस ज्याचा होता तो भावड्या धुरासारखे गायब झाले आहेत. आता कॉलनीतील रहिवासी आणि पोलिस त्यांना शोधत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Embed widget