एक्स्प्लोर

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 76 नेत्यांवर गुन्हा दाखल, शरद पवारही अडचणीत?

मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसारच ही करवाई करण्यात आली आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

मुंबई : महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे हे सगळे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात एकुण 76 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारदारांच्या वकिलांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसारच ही करवाई करण्यात आली आहे. तब्बल 25  हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 76 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा आकडा 300 च्या घरात जाण्याची शक्यता देखील वकिलांनी वर्तवलीय. MSC Bank Scam | शरद पवारांवर महाराष्ट्र शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता, वकिलांचा दावा | ABP Majha राष्ट्रवादीच्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आल्याने राष्ट्रवादी संतप्त झाली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी केलेली कारवाई म्हणजे सूडाचं राजकारण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. EXPLAINER VIDEO | शिखर बॅंक घोटाळा आणि महाराष्ट्राचं राजकारण | बातमीच्या पलीकडे | ABP Majha  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा
  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला तब्बल 1 हजार 500 कोटींचा फटका
  • संचालक मंडळाकडून नाबार्डच्या सूचनांचं उल्लघंन केल्याचा आरोप
  • 9 साखर कारखान्यांना 331 कोटींना कर्जपुरवठा
  • गिरणा, सिंदखेडा करखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचं कर्ज
  • केन अग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं 119 कोटींचा तोटा
  • 24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी
  • 22 कारखान्यांकडील 1995 कोटींचं कर्ज असुरक्षित
  • लघुउद्योगाला दिलेल्या सव्वा तीन कोटींचं नुकसान
  • कर्जवसुलासाठी मालमत्ता विक्रि करुनही 478 कोटींची थकबाकी
  • खासगी पद्धतीने मालमत्ता विक्रि, 37 कोटींचं नुकसान
  • 8 थकवाकीदारांच्या मालमत्ता विक्रित 6 कोटी 12 लाखांता तोटा
कोणावर कितीची जबाबदारी
  • शिवाजीराव नलावडे 34 कोटी
  • राजवर्धन कदमबांडे 25
  • बाळासाहेब सरनाईक 24 कोटी
  • अजित पवार 24 कोटी
  • दिलीपराव देशमुख 23 कोटी
  • जयंत पाटील 22 कोटी
  • तुकाराम दिघोळे 22 कोटी
  • मधुकरराव चव्हाण 21 कोटी
  • आनंदराव आडसूळ 21 कोटी
  • प्रसाद तनपूरे 20 कोटी
  • जगन्नाथ पाटील 20 कोटी
  • गंगाधर कुटुंरकर 20 कोटी
  • मदन पाटील 18 कोटी
  • जयवंतराव आवळे 17 कोटी
  • राजेंद्र शिंगणे 17 कोटी
  • मिनाक्षी पाटील 12 कोटी
  • राहुल मोटे 4 कोटी
  • रजनीताई पाटील 4 कोटी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget