Sharad Pawar NCP : जीएसटी काऊंसिलच्या बैठकीला अर्थमंत्री अजित पवारांची गैरहजेरी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, म्हणाले....
Sharad Pawar NCP : राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा मिळवण्यासाठी अर्थमंत्री बैठकीला उपस्थित न राहणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने टीका करण्यात आली आहे.
Sharad Pawar मुंबई : वस्तू व सेवा कर परिषद अर्थात जीएसटी (GST) काऊंसिल बैठक ही प्रत्येक राज्याच्या विकासात्मक मार्गावरील महत्त्वाची अशी बैठक आहे. देशाचा सर्वाधिक जीएसटी हा महाराष्ट्रातून केंद्राला जातो. सद्यस्थितीत राज्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आणि मुख्यत्वे राज्य सरकार ज्या नवनवीन योजना जाहीर करतंय त्यासाठी निधीचा तुटवडा जाणवतो आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आणि राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा मिळवण्यासाठी अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित न राहणे कितपत योग्य आहे? असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे.
अर्थमंत्र्यांना या प्रश्नांचे गांभीर्य कितपत राहीलंय?
या परिषदेला अर्थमंत्र्यांशिवाय कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. केवळ हजेरी लावण्यासाठी सचिव किंवा इतर मंत्री बैठकीला उपस्थित राहू शकतात. असे असतानाही राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या अपरोक्ष बालविकास विभागाचे मंत्री बैठकीला हजेरी लावतात. तसेच यापूर्वीही या बैठकीला प्रत्यक्षात उपस्थित न राहाता किंवा थेट गैरहजर राहून यातून अर्थमंत्र्यांना या प्रश्नांचे गांभीर्य कितपत राहीलंय याचा जनतेने काय बोध घ्यावा? असा सवालही या पोस्टमधून विचारण्यात आला आहे.
शरद पवार आणि अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनाला
शरद पवार आणि अमित शाह या दोन बड्या नेत्यांनी सोमवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. शरद पवार हे सोमवारी सकाळी त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील लालबागमध्ये उपस्थित होते. मात्र, यावेळी अजित पवार हजर नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची लालबागमधील गैरहजेरी अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली.
वस्तू व सेवा कर परिषद अर्थात जीएसटी काऊंसिल बैठक ही प्रत्येक राज्याच्या विकासात्मक मार्गावरील महत्त्वाची अशी बैठक आहे. देशाचा सर्वाधिक जीएसटी हा महाराष्ट्रातून केंद्राला जातो. सद्यस्थितीत राज्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आणि मुख्यत्वे राज्य सरकार ज्या नवनवीन योजना जाहीर… pic.twitter.com/OE59wgtY6G
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 9, 2024
इतर महत्वाच्या बातम्या