एक्स्प्लोर
तृतीयपंथीयांची तोतया तृतीयपंथीयांना बेदम मारहाण
जळगाव : तृतीयपंथीचं रूप धारण करून वाहन चालकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोन तरुणांना परप्रांतीय तृतीयपंथीयांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली. चोप देत त्यांचं टक्कल करण्यात आलं आणि दोघांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.
मुंबई-नागपूर महामार्गावर बऱ्हाणपूर चौफुलीवर ही घटना घडली. दोन्ही तोतया तृतीयपंथीय मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आहेत.
मध्य प्रदेशातून मूर्तिजापूरकडे चारचाकीने जाणाऱ्या चार तृतीयपंथीयांनी केळी घेण्यासाठी बऱ्हाणपूर चौफुलीवर वाहन थांबवलं. साडी-चोळी घालून तृतीयपंथीयांचे रूप घातलेले दोन तरुण येथून जाणाऱ्या ट्रक चालकांना थांबून त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत असल्याचं त्यांना दिसून आलं. हे पाहताच संतप्त झालेल्या खऱ्या तृतीयपंथीयांनी या दोघांवर हल्ला चढवला.
या बहुरूपी तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. शेजारच्या सलूनवरून कात्री आणून दोघांचे टक्कल केलं. एवढ्यावरच न थांबता बघ्यांच्या गर्दीसमोर दोघा तरुणांना निर्वस्त्र करत मारहाण केल्याची घटना घडली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement