एक्स्प्लोर

धनगर, मुस्लिमांना आरक्षण कसं मिळत नाही पाहतोच; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Dhangar-Muslim Reservation : धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.

Dhangar-Muslim Reservation : मागील 70 वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मनोज जरांगे (Manoj Jarange) यानो सोडवला असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता थेट ओबीस आरक्षणाचा (OBC Reservation) लाभ मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे. असे असतानाच आता धनगर (Dhangar) आणि मुस्लीम आरक्षणाचा (Muslim Reservation) देखील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकराला दिला आहे. 

दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे. एकदा हा प्रश्न सुटला की, धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाही तेच बघतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे. एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या, त्यानंतर मी मोकळाच आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मात्र, हा प्रश्न सुटला पाहिजे याबाबत त्यांनी देखील म्हटलं पाहिजे. त्यांनी एकदा म्हटलं, की मग पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही, असे जरांगे म्हणाले. 

रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय...

मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी रायगडावर पोहचले आहेत. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "रायगडावर गेल्यानंतर ऊर्जा मिळते आणि विजय प्राप्त होतो. त्यामुळे रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. मी रायगडावर पायी जाणार, राजापुढे शरीराला किंमत नसल्याचे जरांगे म्हणाले. 

मराठ्यांना मागास सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची...

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आणि खुल्या वर्गातील समाजाचा सर्वे केले जात आहे. दरम्यान, यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, "सरकरने मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे. आम्हाला बाकी काही माहीत नाही, सरकार आणि मागासवर्ग आयोगाची समाजला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. चांगला सर्व्हे करून सत्य परिस्थिती समोर आणायला हवी. काही ठिकाणी अडचणी येत असतील, मात्र याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आत्ता नाही, असेही जरांगे म्हणाले. 

ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणार...

मराठा समाजाच्या मुलांच्या अन्नात माती मिळवण्याच काम छगन भुजबळ करत आहेत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचं प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं. अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
Rain News : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech Azad Maidan : दोन तासात मुंबई मोकळी करा, आझाद मैदानातील पहिलं भाषण
Manoj Jarange Mumbai Protest : मराठ्यांचं वादळ मुंबईत, आझाद मैदान हाऊसफुल्ल, जरांगे मुंबईत
Manoj Jarange Mumbai Protest : CSMT परिसरात मोठी वाहतूक कोंडी, हजारो आंदोलक रस्त्यावर
Maratha Reservation Protest : जीव जाईल पण मुंबई सोडणार नाही, मराठा आंदोलक तुफान आक्रमक
Maratha Reservation Protest :  आमची हXXXची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा, मराठा आंदोलक संतापला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
Rain News : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
मुंबईत खाऊ गल्ल्या बंद ठेवल्यावरुन जरांगे पाटीलही संतापले, आधी रोहित पवारांनी शेअर केली होती चिठ्ठी
मुंबईत खाऊ गल्ल्या बंद ठेवल्यावरुन जरांगे पाटीलही संतापले, आधी रोहित पवारांनी शेअर केली होती चिठ्ठी
आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, शिंदेंच्या आमदाराचा थोरातांना थेट इशारा; संगमनेरचा राजकीय वाद पेटला
आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, शिंदेंच्या आमदाराचा थोरातांना थेट इशारा; संगमनेरचा राजकीय वाद पेटला
Manoj Jarange: मुदत संपली, लगेच मुदतवाढ मिळाली; मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सुरूच राहणार, उद्याही गर्दी होणार
मुदत संपली, लगेच मुदतवाढ मिळाली; मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सुरूच राहणार, उद्याही गर्दी होणार
Maratha Reservation : मराठा समाजाबाबत आम्ही सकारात्मक, ठाकरे-पवारांनी मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावू नये; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
मराठा समाजाबाबत आम्ही सकारात्मक, ठाकरे-पवारांनी मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावू नये; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
Embed widget