एक्स्प्लोर
पाणी तापवण्याच्या क्षुल्लक कारणावरुन सुनेसह नातवांवर चाकू हल्ला
पाणी तापवण्याच्या क्षुल्लक कारणावरुन सासऱ्याने सुनेसह नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमधील मल्हारपेठ गावात घडली आहे.
कोल्हापूर : पाणी तापवण्याच्या क्षुल्लक कारणावरुन सासऱ्याने सुनेसह नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमधील मल्हारपेठ गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात पाणी तापवण्याच्या कारणावरुन आरोपी पांडुरंग सातपुते आणि त्यांच्या सुनेमध्ये झालेल्या वादातून पांडुरंग सातपुतेंनी आपल्या सुनेसह नातवांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या चाकू हल्ल्यात शुभांगी रमेश सातपुते, मयुरेश रमेश सातपुते, मनीषा रमेश सातपुते यांच्यासह आरोपी पांडुरंग दशरथ सातपुते हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या जखमींवर प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement