एक्स्प्लोर
कर्जबाजारीपणामुळं आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक : कर्जबाजारीपणामुळं आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. येवला तालुक्यातील पिंपरीमध्ये नवनाथ भालेराव यांनी विष पिऊन आत्महत्या केली. नवनाथ यांच्या आत्महत्येनं पिंपरी गावात शोककळा पसरली आहे.
सध्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनं सुरु आहे. पण दुसरीकडे कर्जबाजारीपणाला कंटाळून अवघ्या 30 वर्षाच्या नवनाथने मृत्यूला कवटाळलं. नवनाथ यांच्या आत्महत्येमुळं येवल्यातल्या पिंपरीमध्ये शोककळा पसरली आहे.
नवनाथ यांनी तीन वर्षापूर्वी द्राक्ष लागवडीसाठी जिल्हा बँकेतून सोसायटीचं 3 लाख, सोनं तारण ठेवून एक लाख आणि इतर हात उसनावारीनं, असं जवळपास साडेचार लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण पहिल्या वर्षी अवकाळी पाऊस, दुसऱ्या वर्षी द्राक्षं पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव आणि तिसऱ्या वर्षी द्राक्षाला भाव नसल्यानं नवनाथ हताश झाले होते.
सध्या शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलनं सुरु असल्यानं, या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला होता. आपलंही कर्ज माफ होईल, या आशेनं घोषणाबाजी सुरु होती. पण काल नवनाथ घरी गेल्यावर जेवलेच नाही आणि रात्री विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.
सरकारच्या अल्पकर्जधारक, अल्पभूधारक, अमुक सालापर्यंतचे, तमुक सालापर्यंतचे अशा चक्रात शेतकऱ्याचं आंदोलन लांबत चाललं आहे. त्यातच जुनी समिती, नवी समिती, असे घोळ घातले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement