एक्स्प्लोर

राज्यभरात शेतकऱ्यांचं टाळेठोक आंदोलन

मुंबई: कर्जमाफीसाठी शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी आज बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. जागरण गोंधळ आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संपूर्ण कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशी तीव्र झालं आहे. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. या वेळी 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूर, नाशिकमध्येही टाळं तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील रायपूरमध्ये आंदोलकांनी तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं. कोल्हापुरातल्या शिये गावात रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनं तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजीपाल्याची आवक घटली शेतकरी संपाचा परिणाम शहरांमध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात केवळ 1 टक्केच भाज्यांची आवक झाली आहे तर दूधाचं संकलन झालंच नाही आहे. यामुळे नगरमध्ये आज लोकांची मोठी गैरसोय होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या घरासमोरच भाजीपाला फेकला अमरावती आणि पुणतांब्यात शेतकऱ्यांचा रोष आजही पाहायला मिळाला कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्तांच्या घरासमोरच भाजीपाला फेकून दिला. यामध्ये पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. A तर तिकडे पुणतांब्यात सरकारचा दहाव्याचा विधी करून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ ठप्प शेतकरी संपामुळे ग्रामीण अर्थकारण मोठ्या प्रमाणावर संकटात सापडल्याची प्रतिक्रिया नाशिक कांदा बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकरांनी दिली आहे. शेतकरी संपात ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. 100 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल थांबली आहे.  शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजंदारी बुडाली आहे. राज्यभरात शेतकऱ्यांचं टाळेठोक आंदोलन 17 मोठ्या बाजारसमिती आणि 20 उपबाजार समितीत रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे भविष्यात निर्यातीवर आणि भावांवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget