एक्स्प्लोर

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं!

भूसंपादनाचं प्रकरण आता चांगलच तापलं आहे. वडवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं.

बीड : भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचं काम बंद पाडलं. भूसंपादनाचं प्रकरण आता चांगलच तापलं आहे. वडवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं. केवळ 1300 रुपये प्रति गुंठा दराने खरेदी वडवणीच्या दत्तात्रय पतंगे यांची 15 एकर शेती आहे. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आहे. मात्र, आता साडे पाच एकर क्षेत्रावरून रेल्वेचा मार्ग जाणार आहे आणि या साडेपाच एकराचे त्यांना 1300 रुपये गुंठ्या प्रमाणे पैसे मिळाले आहेत. तर या जमिनीचा भाव एकरी पंधरा लाख रुपय असल्याचा दावा त्यांनी केला. 1800 कोटी रुपये खर्च करुन नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम युद्धपातळीवर चालू आहे. नगर ते बीड आणि बीड ते परळी असे दोन टप्प्यात हे काम चालू आहे.  या रेल्वेमार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आणि त्याचा मोबदला कावडी मोल भावाने देण्यात आल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी वडवणी जवळ बाहेगव्हाण गावच्या शिवारातून जाणारं रेल्वेमार्गाचं काम बंद पाडलं. वडवणी तालुक्यातील या शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी खेटा मारल्या. मंत्र्यांना निवेदनं देखील दिली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून विकास करत असल्याचा दावा सरकार करत आहे. तर दुसरीकडे शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी सरकार दरबारी न्याय मागत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याने शेतकरी आंदोलन करू लागले आहेत. बीडपासून ते परळीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जुन्या कायद्याप्रमाणेच जमीन अधिगृहण बाहेगव्हाणचे विठ्ठल मस्के यांच्या संपूर्ण आठ एकर शेतीतून हा मार्ग जात असल्याने ते पूर्णतः भूमीहीन झाले आहेत. मात्र, अजूनही त्यांची प्रकल्पगृस्त म्हणून नोंद केलेली नाही. निजाम काळातल्या कायद्याप्रमाणे जमिनीचं अधिगृहण केलं आणि त्याच जुन्या कायद्याचा आधार घेऊन सरकारने नवीन अधिगृहण निर्णय डावलून आमची फसवणूक केल्याचं ते सांगतात. सध्या या शिवारात अप्पर कुंडलीकाचं पाणी येणार असून या जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारने मात्र नोंद करताना अशा अनेक गोष्टींची नोंद देखील केलेली नाही. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी हा रेल्वेमार्ग राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे. म्हणूनच येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडला रेल्वे पोहोचण्याचे संकेत मिळत असले तरी बीडहून परळीकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गात मात्र या शेतकरी आंदोलनामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर आता कसा तोडगा काढला जातो, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget