एक्स्प्लोर

Mahavitaran Scam l शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नये : रघुनाथदादा पाटील

वीज नियामक आयोगाच्या अहवालातून महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. यावर शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नये, असं आवाहन केलंय.

सांगली : महावितरण वीज कंपनीकडून शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली 30 हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नयेत आणि लुटण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लाववा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. ते सांगली मध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वीज नियामक आयोगाच्या चौकशीत हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून तब्बल 22 हजार कोटी रुपये, तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून आठ हजार 225 कोटी रुपये लाटले आहेत. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. कृषिपंपाच्या मीटर रीडिंगमध्ये महावितरणकडून घोळ, शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट! शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत - शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन 1998 मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. कर कर्जा नही देंगे, बिजली का बिल नही देंगे, अशी घोषणा यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना याबाबत नेहमीच लढत राहिली आहे. आज शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, शेतकरी गेली 10 वर्षांपासून वीजे बिले भरत नाहीत. मात्र, तरीही बहुतांश शेतकरी हे वीज बिले भरत राहिले. काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीपंप वीज बिले माफ केल्याची घोषणाबाजी केली होती. काही काळ फक्त याची अंमलबजावणी झाली. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्यास सुरवात केली. वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग आहे. शेतकरी संघटनेची जी भूमिका होती, ती योग्य होती, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तरी शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये आणि वीज बिलाच्या माध्यमातून लुटण्यात आलेले पैसे परत मिळवण्यासाठी सरकारकडे तगादा लावला पाहिजे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. Web Exclusive | महावितरणकडून गोलमाल, शेतकऱ्यांना 30 हजार कोटींना लुटले? | ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget