एक्स्प्लोर
शेतकरी संपावर : संपाचा सातवा दिवस, सरकारविरोधात आज मौन आंदोलन
मुंबई : शेतकऱ्यांच्या सात दिवसाच्या संपाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सरकारच्याविरोधात मौन आंदोलन केलं जाणार आहे. सरकार बहिरं आहे. त्यामुळे त्याला ऐकू येत नाही म्हणून मौन आंदोलन केलं जाणार आहे.
शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा सुकाणू समितीच्या वतीनं ठरवण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे जीएसटीसाठी विशेष अधिवेशन घेतलं, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घ्या अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनात आज दिवसभरात कुठे काय होणार
पुणतांबा मौन आंदोलन होणार, सुकाणू समितीची बैठक होणार
पुणे पिंपरी-मेंढार गावाला राजू शेट्टी भेट देणार
धुळे आंदोलनाला पाठिंब्यासाठी तापी नदीपात्रामध्ये आंदोलन
जळगाव आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंडण आंदोलन
जालना तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचं धरणं आंदोलन
वर्धा आर्वीमध्ये प्रहार सोशल फोरमच्या वतीनं बंदची हाक
चंद्रपूर शहरात सर्वपक्षीय बंदची हाक
आवक वाढल्यानं भाज्यांचे दर उतरले
नाशिकसह पुण्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे दर उतरले आहेत. सामान्य शेतकऱ्यांनी संपाला कंटाळत बाजारात शेतमाल नेणंच पसंत केलं आहे. त्यामुळे आवक वाढल्यानं भाजीपाल्यांचे दर पूर्वपदावर येऊ लागले आहेत. नाशिकमध्येही भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पोचला आहे. तर पुण्यामध्येही भाजीपाल्याची आवक 70 टक्के झाली आहे.
संपाच्या नेतृत्वासाठी शेतकरी राज ठाकरेंना भेटले
दरम्यान काल मंगळवारी पुणतांब्यातील काही शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना संपाचं नेतृत्त्व करण्याची विनंतीही केली.
गरजू शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणारच : मुख्यमंत्री
दरम्यान काल मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा पुनरुच्चार केला. कर्जमाफीबद्दल केवळ शेतकऱ्यांशीच चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. त्यासाठी 4 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement