एक्स्प्लोर
मुंबईतील शक्ती मिलची जागा विकून कर्जमाफीचा निधी उभारु : चंद्रकांत पाटील
मुंबईतील शक्ती मिलच्या मालमत्तेची किंमत 38 हजार कोटींच्या घरात आहे. शक्ती मिलच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रक्कम उभी करता येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
![मुंबईतील शक्ती मिलची जागा विकून कर्जमाफीचा निधी उभारु : चंद्रकांत पाटील Farmers Loan Waiver Will Be Done By Selling Shakti Mill Says Chandrakant Patil Latest Maathi News Updates मुंबईतील शक्ती मिलची जागा विकून कर्जमाफीचा निधी उभारु : चंद्रकांत पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/27075104/chandrakant-patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : मुंबईतील शक्ती मिलची मालमत्ता लवकरच ताब्यात घेणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटीस यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलीय. या मालमत्तेची विक्री करुन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी उभारु असही चंद्रकांतदादा म्हणाले आहेत.
महिला पत्रकारावर झालेल्या बलात्कारामुळे चर्चेत आलेल्या मुंबईतील शक्ती मिलच्या मालमत्तेची किंमत 38 हजार कोटींच्या घरात आहे. शक्ती मिलच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रक्कम उभी करता येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर कर्जमाफीसाठीचा निधी कुठून उभारता येईल याची चाचपणी राज्य सरकारनं चालवली आहे.
दरम्यान शक्ती मिलच्या मालमत्तेच्या विक्रीवर न्यायालयाची स्थगिती आहे. मात्र राज्य सरकारनं वकिलांची फौज कामाला लावून स्थगिती हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती चंद्रकांतदादांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)