अजित पवार म्हणाले पैसे भरा, शेतकरी म्हणाले सातबारा कोरा करा, एक पैसाही भरणार नाही, बुलढाण्यात आंदोलन
कर्जमाफीच्या (loan waiver) मुद्यावरुन राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 31 मार्चच्या आत पैसे भरा असं वक्तव्य केलं होतं.
Buldhana : कर्जमाफीच्या (loan waiver) मुद्यावरुन राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 31 मार्चच्या आत पैसे भरा असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी जोरदार टीका केली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली येथील बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेसमोर आज शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले सातबारा कोरा करु तर अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात पैसे भरा, असे म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
विधानसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन सातबारा कोरा करु, तर काल-परवा अजित पवार म्हणतात 31 तारखेपर्यंत कर्ज भरा. सरकारमधीलच दोन नेते परस्पर विरोधी विधान करत असल्यामुळं सामान्य शेतकरी हा द्विधा मनस्थितीत आहे. आम्ही कर्ज भरणार नाही. जोपर्यंत आमचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही एक पैसेही भरणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.
राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. मात्र, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























