एक्स्प्लोर
कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल 300 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
नाशिक आणि मनमाडमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या प्रतिक्विंटल दरात आज 300 रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले.

मनमाड : दोनच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्यावरील अनुदानात 5 वरून 10 टक्क्यांची वाढ झाली. परिणामी आज लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. कांद्याच्या प्रतिक्विंटल दरात आज 300 रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी मनमाडमध्ये लाल कांद्याला 550 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत होता. त्यामध्ये आज 300 रुपयांची वाढ होऊन शेतकऱ्यांना 850 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. कांद्याला मिळणाऱ्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 773 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामध्ये आज 158 रुपयांची वाढ होऊन शेतकऱ्यांना 931 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. संबधित बातमी : कांदा निर्यातीला दुप्पट सबसिडी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
आणखी वाचा























