एक्स्प्लोर

जिगरबाज शेतकरी दाम्पत्याने लॉकडाऊन काळात खोदली 30 फूट विहीर; खडकाळ जमिनीत फुलविली शेती

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याने लॉकडाऊन काळात खडकाळ जमिनित 30 फुट विहिर खोदली आहे. या विहिरीला पाणी लागले असून त्यावर आता ते शेती करत आहे.

यवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात अनेकजण काही ना काही करताना दिसत आहे. यात विशेष करुन इंटरनेटवर वेळ घालवणारे जास्त आहेत. मात्र, यवतमाळच्या एका जिगरबाज शेतकऱ्याने आपल्या शेतात विहीर असावी हे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नासाठी जिद्दीने झोकून देऊन कष्ट उपसले आणि अडचणींवर मात करीत खडकाळ जमिनीत 30 फूट खोल विहीर खोदली. या विहिरीला पाणी लागले असून आता त्याच पाण्यातून शेतात सिंचन करीत आहेत. आर्णी तालुक्यातील लोनबेहळ येथील जिगरबाज शेतकरी रामदास पिलावन हे खऱ्या अर्थाने या भागातील लोकांसाठी प्रेरणास्रोत मांन्झी झाले आहेत.

रामदास पीलवन यांनी खडकाळ जमिनीत एकट्याने टीकास फावडे घेऊन विहीर खोदली आहे. दुसऱ्याच्या शेतात रोजमजुरी करून आल्यावर सायंकाळी स्वतःच्या 4 एकर कोरडवाहु शेतात जाऊन रात्र होईस्तोवर ते अविरत शरीर थकेपर्यंत विहीर खोदण्याचे काम करायचे. ज्या दिवशी गावात मजुरीचे काम मिळाले नाही त्या दिवशी त्यांची पत्नी तुळजा आणि रामदास पिलावन हे दाम्पत्य विहीर खोदायचे असे रोज रोज करीत अडथड्याची शर्यत पार करीत त्यांनी विहीर खोदली. आता त्या विहिरीला पाणी लागले आहे.

बादलीने पाणी काढून पिकांना पाणी शेतात वीज कनेक्शन नसल्याने ते बादलीच्या किंवा डबकीच्या साहाय्याने झाडांना आणि पिकांना पाणी देतात. नुकतेच त्यांनी यात पद्धतीने कारलेच्या पिकांना पाणी देत पीक घेतले. आता त्यांनी खरबूजचे रोपं लावली असून खरीपमध्ये ते कापूस सोयाबीन आणि भाजीपाला पीक घेण्याचा त्यांचा मानस आहे. जेव्हा विहिरी खोदायला सुरुवात केली त्यावेळी त्यांची पत्नी गाळ उचलून टाकायची. रामदास पिलावन हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून सायंकाळी आल्यानंतर ते स्वतःच्या शेतात विहीर खोदण्याचे काम करायचे. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी त्यात शेतात विहीर असावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते झटले आणि त्यांनी 30 फूट खोल विहिर खोदून दाखविली. विहिरीत उतरताना त्यांनी आपट्याच्या झाडाला दोर बांधून त्यानंतर काही लाकडी शिडी लावून पुन्हा खाली उतरत विहीर खोदत नेली.

आवश्यक वस्तू कायद्याची विषवल्ली मुळातून उखडा, 'किसानपुत्र'ची मागणी

म्हणून सरकारी विहिर मिळाली नाही रामदास पिलावन यांच्याकडे वडिलोपार्जित 8 एकर जमीन दोन्ही भावात शेतीची समान वाटणी झाली. मात्र, ती कागदोपत्री नोंद नसल्याने त्यांना सरकारी योजनेमधून विहीर योजना भेटू शकली नाही. अशावेळी त्यांनी कोरडवाहू शेतात अल्प उत्पन्न यायचे. या काळात ते कधी नाउमेद झाले नाही, ध्यास घेऊन ते जगले. आज विहीर असल्याने समाधान आहे, असे तुळजा पिलावन यांनी सांगितले. विहीर खोदून रामदास पिलावन थांबले नाही. त्यांनी शेतातील दगड धोंडे वेचून काढले आणि शेताच्या काठावर याच दगडांच्या साहाय्याने दगडीबांध तयार करून शेतातील माती वाहून जाणार नाही याची काळजी घेतली. आज त्यांची मेहनत जिद्द चिकाटीने गावकरी कौतुक करत आहे. जिद्द चिकाटी असली की कुठलेही कार्य साध्य होऊ शकते हे पिलावन दाम्पत्याने करून दाखविले. आज त्यांच्या सकारात्मक कार्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.

Cyclone Nisarga | चक्रीवादळामुळे रायगडच्या धामणी गावात पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget