एक्स्प्लोर
कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर परिवारातील तिघांची आत्महत्या
परभणी : वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुली आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत समोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे कुटुंबातील उर्वरित चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर दुःखाच्या भरात पत्नी आणि तीन मुलांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
परभणी शहरातील नानाल पेठ भागात राहणाऱ्या 70 वर्षीय चंद्रकांत डांगे यांचा आजारपणाने मृत्यू झाला. त्यानंतर 65 वर्षीय पत्नी शैला, 42 वर्षीय कन्या रेणुका आणि 35 वर्षीय कन्या प्रणिता यांनी आत्महत्या केली, तर आत्महत्येचा प्रयत्न करणारा 30 वर्षीय मुलगा सदानंद डांगे वाचला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement