एक्स्प्लोर
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातच बनावट दारुचा अड्डा
अहमदनगर : अहमदनगरमध्ये बनावट दारुमुळे सहा जणांचा बळी गेल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं आहे.
कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. त्यामुळे यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते.
जेऊर गावात निवडणुकीच्या पार्टीत विषारी दारुमुळे सहा जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख भीमराम आव्हाड याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहिनीनंतरच रुग्णालयाच्या कॅन्टीनवर छापा टाकण्यात आला.
या परिसरात अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरु असतात. मात्र जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं याकडे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसतं.
सध्या पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागातर्फे संपूर्ण परिसराची तपासणी सुरु आहे. जिथे रुग्णांचे प्राण वाचवले जातात, त्याच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात लोकांचे बळी घेण्याचा हा प्रकार गंभीर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement