एक्स्प्लोर

Fake Currency Racket: एचडीएफसी बँकेत जमा केल्या नकली नोटा, बुलढाण्यातील एमआयएमच्या माजी जिल्हा अध्यक्षास अटक

Fake Currency Racket: अलीकडेच बुलढान्यातील मलकापूर येथील एचडीएफसी बँकेत (HDFC BANK) गेल्या 23 फेब्रुवारीला एका व्यापाऱ्याने 500 रुपयांच्या 38 नकली नोटांचा भरणा केला होता.

Fake Currency Racket: अलीकडेच बुलढान्यातील मलकापूर येथील एचडीएफसी बँकेत (HDFC BANK) गेल्या 23 फेब्रुवारीला एका व्यापाऱ्याने 500 रुपयांच्या 38 नकली नोटांचा भरणा केला होता. त्यावेळी बँकेच्या कॅशियरने मलकापूर पोलीसात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. या सर्वांची चौकशी केल्यानंतर आज मलकापूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील एमआयएमच्या माजी जिल्हा अध्यक्षास अटक केली आहे.  सैजाद खान सलीम खान असं त्यांचं नाव असून आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्यांनी मलकापूर परिसरात अवैध बायोडिझेलचं मोठं जाळ उभारलं आहे. 

आज एमआयएमच्या माजी अध्यक्ष सैजाद खान यांना अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांना या प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी सैजाद खान यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी (मुळ रा. गुजरात ह. मु. वडनेर, भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून आतापर्यंत सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली. यात खामगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान, मंगळवारी पहाटे तीन वाजेदरम्यान शहर पोलिसांनी 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' म्हणजेच एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहेजाद खान यांना मलकापूरातील माळीपुरा मंगलगेट परिसरातून अटक केली. या पूर्वी अटकेत असलेल्या आरोपीने सैजाद खान याच्या नावाची कबुली दिल्याने ही अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या पूर्वी अटकेत असलेल्या आरोपीने सैजाद खान यांच्या नावाची कबुली दिल्याने ही अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. नकली नोटा चलनात आणण्याचं रॅकेट जिल्ह्याभरात सुरू असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget