एक्स्प्लोर

'आजचा हिंदू समाज सडलेला!', एल्गार परिषदेत शार्जील उस्मानीच्या वक्तव्यानं वादंग

आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी यानं केलं आहे. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे.

पुणे : आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी यानं केलं आहे. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही विकृत मानसिकता असल्याचे म्हटले आहे.

पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शार्जील उस्मान म्हणाला की, आज हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लिम होते, असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं म्हटलं की, हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करुन हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीन हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत, असं त्यानं म्हटलं आहे.

मुख्यमंंत्र्यांनी कारवाई करावी- प्रवीण दरेकर

या संदर्भात बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शार्जील उस्मानी यांनी केलेलं हे वक्तव्य हे विकृत मानसिकतेतून आलं आहे. त्यांचाच मेंदू सडला आहे, असं दिसतंय. आता या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे हिंदू समाजावर टीका करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे दाखवून द्यावं ही अपेक्षा आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरेकर म्हणाले की, मुस्लिम समाजावर एखादं वक्तव्य झाल्यावर तात्काळ कारवाई केली जाते किंवा भूमिका घेतली जाते, आता हे वक्तव्य आल्यावर या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.

कोण आहे शार्जील उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठात सिटीजन अमेंडमेंट ॲक्टच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. शार्जील उस्मानी हा विद्यार्थी म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. हा मोर्चा सुरू असतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मोठा हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचाराला जबाबदार धरत विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये शार्जील उस्मानीचा समावेश होता. जुलै महिन्यात न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केलं होतं. शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेसाठी वक्ता म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
पुण्यात ACB ची मोठी कारवाई, दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहात पकडलं 
पुण्यात ACB ची मोठी कारवाई, दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! दोन पोलिसांनी किडनॅप करुन एकाला लुटले, मुंबईच्या जुहूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस 
धक्कादायक! दोन पोलिसांनी किडनॅप करुन एकाला लुटले, मुंबईच्या जुहूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Sushma Andhare On Rupali Chakankar यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी
Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
Embed widget