एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मलकापुरात आली अन् शहरातील बत्ती गुल झाली
जळगावच्या जामनेर येथून दुपारी यात्रा आज बुलडाण्याच्या मलकापूर येथ पोहोचली. मात्र, शहरवासियांना याचा मोबदला म्हणून नाहक पाच तासाच्या खंडित वीज पुरवठ्याचा फटका सहन करावा लागला.
बुलडाणा : दुसऱ्या टप्यातील मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज मलकापूर इथं आली. मात्र या यात्रेमुळे मलकापूर शहरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. जेव्हा मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहराबाहेर जाताच विद्युत पुरवठा चालू झाला. हा वीज पुरवठा तब्बल पाच तास बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून धुळे नंदूरबारपासून सुरु झाला. ही यात्रा आज शनिवारी जळगावच्या जामनेर येथून दुपारी यात्रा आज बुलडाण्याच्या मलकापूर येथ पोहोचली. मात्र, शहरवासियांना याचा मोबदला म्हणून नाहक पाच तासाच्या खंडित वीज पुरवठ्याचा फटका सहन करावा लागला.
त्याच झालं असं, तीन ऑगष्ट रोजी भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेमध्ये अभिवादन करताना अचानक विजेच्या तारेमुळे होणारा अपघात खाली वाकल्याने टळला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज मलकापूर शहरातील ज्या ठिकाणाहून ही यात्रा जाणार होती, त्या ठिकाणच्या पाच किलोमीटर अंतरातील वीज खंडीत केली गेली होती. या मार्गातील विजेच्या काही तारा देखील काढण्यात आल्या होत्या. यामुळे मलकापूरवासियांना त्रास सहन करावा लागला.
केवळ अर्ध्या तासातच ही यात्रा पुढच्या यात्रेच्या सभेच्या ठिकाणासाठी निघाली. यात्रा पुढे गेल्यानंतर रस्त्यावरच्या काढलेल्या विजेच्या तारा जोडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. एकीकडे महाजनादेशाच्या नावाखाली आपण केलेली कामे दाखवण्याचा प्रयत्न करत सरकार करत असतांना दुसरीकडे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement