एक्स्प्लोर

Shiv Sena : आम्हीच खरी शिवसेना, ठाकरे गटाच्या 14 आमदारांना निलंबित करा; राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गट उच्च न्यायालयात

Shiv Sena MLA Disqualification Case: शिंदे गट हाच खरी शिवसेना असून आमचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे.

मुंबई: आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे आमचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांचं निलंबन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narwekar) निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या आधी ठाकरे गटानेही या निकालाच्या विरोधात  (Shiv Sena MLA Disqualification Case) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला गोगावलेंच्या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. 

आम्हीच खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

ठाकरे गटही सर्वोच्च न्यायालयात 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही. 

विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून त्यावर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये फेरफार करून विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सुनील प्रभू हे व्हीप नसल्याचे सांगत त्यांना विधिमंडळाची बैठक बोलावण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली होती. त्यामुळे गोगावले यांची नियुक्ती वैध असेल तर त्यांचा व्हिप न पाळणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना निलंबित करा अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Mumbai Goregaon Fire: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: 'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
Embed widget