VIDEO : एकाच गाडीत दाटीवाटी, सुषमा अंधारेंनी काढली गुवाहाटी, दादा म्हणाले व्हिडीओ व्हायरल करणारे मूर्ख!
Ajit Pawar Viral Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
Ajit Pawar Viral Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओवरुन विरोधकांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बसल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओत काय आहे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरश महाजन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे सर्व नेते एकाच वाहनातून प्रवास करत असल्याचं त्या व्हिडीओत दिसत आहे. गाडीत बसताना नेत्यांना दाटीवाटीने बसावं लागले. त्यावेळचा व्हिडीओ गाडीच्या चालकाने काढला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
जर केली नसती सुरत गुवाहाटी
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) January 17, 2024
तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!!#goodmorning pic.twitter.com/MFkKanbiFm
अजित पवार काय म्हणाले ?
व्हिडीओ व्हायरल करणारे लोक मूर्ख आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी कोण कोणत्या गाडीत बसणार. हे चेक केले जातं. मंत्रिमंडळातील सहकारी गिरिश महाजन यांना गालावर जखम झालेली आहे. या कार्यक्रमावेळी त्यांना गाडीच राहिली नाही. त्यामुळे त्यांना आमच्या गाडीत बोलवलं. आपल्याला जवळचं जायचेय, आपण दाटीवाटीनं जाऊयात, असे मी त्यांना सांगितलं होतं. आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाहीत. सर्वांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत. त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असे मला वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले.
विरोधकांचं टीकास्त्र -
अजित पवार आणि इतर नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील विरोधकांनी हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ पोस्ट करत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडूनही सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. यासाठीच पक्ष फोडला का? अशी टीका अजित पवारांवर करण्यात आली. "जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी", असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केलेय.
दोघात तिसरा आता सगळ विसरा !!!#MaharashtraGovernment #Maharashtra #NCP pic.twitter.com/F2OCfo8tIx
— NCP (@NCPspeaks) January 17, 2024