एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भगवानगडावर शक्तीप्रदर्शन नव्हे, भक्तीप्रदर्शन : एकनाथ खडसे
मुंबई : भगवान गडावर शक्तीप्रदर्शन नसून भक्तीप्रदर्शन आहे, असे म्हणत राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडेंचा स्वभावच संघर्षाचा असल्याचं म्हणत खडसेंनी पंकजा मुंडेंचं कौतुकही केलं.
"भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलीय. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक भगवान गडावर येत असतात. यंदा पंकजाताईंच्या नेतृत्त्वाखाली सर्वच्या सर्व भाविक भगवान गडावर आले आहेत.", असे खडसे म्हणाले.
"भगवान गडावर जाऊन भगवान बाबांचं दर्शन घेणं हा सर्वांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे हे शक्तीप्रदर्शन नसून भक्तीप्रदर्शन आहे.", असेही खडसे यांनी नमूद केले.
नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे वादावर खडसे काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये भगवान गडावरील भाषणावरुन वाद सुरु होता. या वादावर खडसे म्हणाले, "पंकजा भगवान गडावर भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. सर्वजण भगवान बाबांच्या दर्शनासाठी जातात. नामदेव शास्त्री महंत आहेत. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी भेटणं किंवा न भेटणं हा विषय असूच शकत नाही."
पंकजा मुंडेंचा स्वभाव संघर्ष करण्याचा : खडसे
"पंकजा मुंडे यांचं व्यक्तिमत्त्व गोपीनाथ मुंडेंसारखेच आहे. गोपीनाथ मुंडेंनीही आयुष्याभर संघर्ष केला. कधी अंतर्गत संघर्ष, तर कधी बाह्य संघर्ष. पंकजाही संघर्ष करते. पंकजा यांचा संघर्ष वाईटाविरोधात आहे. ती चांगल्या कामासाठी संघर्ष करते आहे.", असे म्हणत खडसेंनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement