एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे
पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोरच मांडली. किंबहुना, त्यांना उद्देशूनच त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
धुळे : ज्यांनी पक्षामध्ये आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली, असे नेते पक्षाबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ नेते पक्षामध्ये येत आहेत, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
धुळे जिल्ह्यात ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते.
पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोरच मांडली. किंबहुना, त्यांना उद्देशूनच त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
“आमच्या पक्षामध्ये असं झालंय की, ज्यांनी आयुष्य घालवलं पक्षामध्ये, ज्यांनी सत्ता आणली ते बाहेर आणि नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणसं आतमध्ये. मी मुद्दामहून श्याम जाजू साहेबांसमोर सांगतोय.”, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
भाजप नेत्यांनाच चिमटे
ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोला लगावत एकनाथ खडसेंनी भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमोरच स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना चिमटे काढले.
खडसेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीने आपला अहवाल सादर केला आहे. 30 जून रोजी सादर केलेल्या या अहवालात झोटिंग समितीनं खडसेंवर ताशेरे ओढले.
याच भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांची गेल्या वर्षी 4 जून 2016 रोजी मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होती. खडसे दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्रिपदावर म्हणजेच महसूलमंत्री होते.
खडसेंनी सोडलेली मंत्रिपदं :
- महसूल
- कृषी
- पशूसंवर्धन
- राज्य उत्पादन शुल्क
- दुग्धविकास आणि मत्स्यपालन
- अल्पसंख्याक विकास आणि वक्फ मंत्री
वाचा : एकनाथ खडसे यांची कारकीर्द
महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी एका वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे. खडसेंवरील आरोप :- कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक
- जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप
- दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा
- भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद
- 2 सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाळी गावात जन्म झाला.
- खडसेंचे वडील शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण कोठाळी गावातील शाळेतच झालं.
- खडसेंना सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच राजकारणात सक्रीय होते.
- एकनाथ खडसे 1987 मध्ये खडसे कोठाळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. तिथूनच्या त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला
- 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
- खडसेची सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी निवड झाली.
- 1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं.
- 2010 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ खडसेंची निवड झाली.
- तर 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
- ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने खडसे नाराज होते, मात्र त्यांची महसूलमंत्रीपदी वर्णी लागली.
- एकनाथ खडसे यांची सून रक्षा या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत.
- खडसे महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी या महानंद डेअरीच्या संचालक झाल्या.
- तसंच मुलगी रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement