एक्स्प्लोर
Advertisement
शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडणी द्या, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही : खडसे
‘शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही तर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
नागपूर : ‘शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही तर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसे अधिवेशनात आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
‘शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न 2010-11 सालापासून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबत सरकार निर्णय कधी घेणार आहे,’ असा सवालही खडसेंनी केला.
‘उत्तर महाराष्ट्रातील 51 हजार शेतकरी वीज कनेक्शनपासून वंचित आहेत. नुसत्या जळगावात 17 हजार शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन नाही. आठ वर्षांत जर सरकार वीज कनेक्शन देऊ शकत नसेल, तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान, मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी सरकारने लाखो रुपये उधळल्याचा आरोप खडसेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. खडसेंच्या या आरोपामुळेही राज्य सरकारची मोठी कोंडी झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement