पानाचा विडा महागणार...खाण्याच्या पानाला पावसाचा फटका, गावरान पान 20 टक्के तर कलकत्ता पान दुपटीनं महागलं
चेन्नई येथील मद्रासी पान येणे बंद झालंय. त्यामुळे आता 20 रुपयांचे मसाला पान 25 रुपयांना मिळणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
उस्मानाबाद: भारतीय संस्कृतीमध्ये विड्याच्या पानाचे एक वेगळेच महत्त्व आहे.माऊथ फ्रेशनर, पूजापाठपासून ते एखाद्या खास कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो. परंतु आता तुमचे तोंड लाल करणारं हे पान महागणार आहे. कारण वाढलेले तापमान आणि लांबलेल्या पावसाचा फटका आता खायच्या पानालाही बसला आहे. गावरान पान 20%,तर ‘कलकत्ता’ पानाच्या किंमतीत दुपटीनं वाढ झालीये. श्रावण महिन्यात पूजा, धार्मिक विधींसाठी विड्यांच्या पानांची मागणी वाढते. अशातच चेन्नई येथील मद्रासी पान येणे बंद झालंय.. त्यामुळे आता 20 रुपयांचे मसाला पान 25 रुपयांना मिळणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
गावरान पानांचे दर 20 टक्क्यांनी, तर कलकत्ता पानांचे दर दुप्पट
श्रावण महिन्यात पूजा, धार्मिक विधींसाठी विड्यांच्या पानांची मागणी वाढते. अशातच चेन्नई येथील मद्रासी पान येणे बंद झाले आहे. शिवाय काही भागात वाढलेले तापमान, उशिराने आलेला मोसमी पाऊस आणि काही भागात पावसाने दिलेली ओढ यामुळे राज्यातील गावरान पानांचे दर 20 टक्क्यांनी, तर कलकत्ता पानांचे दर दुप्पट वाढले आहेत. गावरान पाने 20 दिवसांपूर्वी 80 रुपये शेकडा होती. ती आता 100 रुपये शेकडा दराने मिळत आहेत. कोलकाता येथून येणारी कलकत्ता पाने 300 रुपये शेकडा होती. त्यांचा दर 600 रुपये झाला आहे. कलकत्ता आणि गावरान पानांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता 20 रुपयांचे मसाला पान 25 रुपयांना करणार आहे. पानांच्या दरवाढीमुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे.
नागवेलीवरची ही पाने रेल्वेने देशभरात पोहोचवली
श्रावण सुरू झाल्याने पानांची मागणी वाढली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशातून पाने आणली जातात. कलकत्ता, बनारस या पानांचे मळे पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांत आहेत. मद्रास हे पान तामिळनाडूतून येते. नागवेलीवरची ही पाने रेल्वेने देशभरात पोहोचवली जातात. महाराष्ट्रात सातारा, सांगली, रुपयांत मिळत आहेत. सोलापूरसह कन्नड, सोयगाव, सिल्लोड भागातही नागवेलीचे मळे आहेत.
विड्याची पाने येतात विडूळ, तेलंगणातून
विड्यासाठी लागणारी साहित्याची पानांचा यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडूळमधून तसेच तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातून आणि स्थानिक गुंडवळ व लांजी येथून मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येतात. रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान हे खूपच उपयुक्त आहे. खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ हे वेदनाशामक कार्य करत असल्याचे आयुर्वेदामध्ये आढळतात.
हे ही वाचा :